Airtel network is down, everything from broadband to mobile services is down PPK


लाखो भारतीयांना सेवा देणाऱ्या एअरटेलचे नेटवर्क ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी (ता. 26 डिसेंबर) सकाळी 11 वाजल्यापासून ही सेवा ठप्प झाली असून पण काही तासांनंतर ती पुर्ववत झाल्याची माहिती एअरटेल कंपनीकडून देण्यात आली.

मुंबई : लाखो भारतीयांना सेवा देणाऱ्या एअरटेलचे नेटवर्क ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी (ता. 26 डिसेंबर) सकाळी 11 वाजल्यापासून ही सेवा ठप्प झाली असून पण काही तासांनंतर ती पुर्ववत झाल्याची माहिती एअरटेल कंपनीकडून देण्यात आली. परंतु, तरी देखील एअरटेल नेटवर्क वापरणाऱ्यांना यामुळे काम करण्यात अडथळा येत असल्याची माहिती समोर आली आहे. आऊटेज ट्रॅक करणारी साईट Downdetector ने ही आऊटेजची समस्या असल्याचे म्हटले ज्यानंतर सोशल मीडियावरून ही Network Down असे व्हायरल झाले. (Airtel network is down, everything from broadband to mobile services is down)

एअरटेलचा मोठा ग्राहक वर्ग आहे. ही कंपनी मोबाइल सिम सर्व्हिसपासून ते ब्रॉडबँडपर्यंतच्या सेवा पुरवते. अचानक सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांना याचा मोठा फटका बसला. त्यांच्या दैनंदिन कामात व्यत्यय आला. ऑनलाइन बैठका, कार्यशाळेपासून ते इतर सेवांमध्ये अडथळा आला. अर्थात ही सेवा संपूर्ण देशात विस्कळीत झाली नाही तर देशातील काही भागात त्याचा परिणाम दिसून आला. सकाळी 11 वाजल्यापासून एअरटेल आऊटेजची सुरुवात झाली. त्यानंतर कंपनीने ही समस्या लागलीच सोडवल्याचा दावा केला आहे. तरीही अनेक ग्राहकांच्या मोबाईलमधील इंटरनेट सेवा अजूनही कासवगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी कॉल ड्रॉपचा फटका बसला आहे.

– Advertisement –

हेही वाचा… IRCTC Down : आयआरसीटीसीची ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा ठप्प; नेमकं काय घडलं?

नेटवर्क डाऊन झाल्याची तक्रार करत अनेक नेटकऱ्यांनी No Signals ची समस्या येत असल्याचे म्हटले. त्यानंतर त्यांना ना मोबाईल सेवा मिळाली ना इंटरनेटची सुविधा मिळाली. त्यांचे मॅसेज सुद्धा समोरच्या व्यक्तीला मिळाले नाहीत. तर काहींना इंटरनेटचा वापर करता आला नाही. सेवा विस्कळीत होण्याचा परिणाम देशातील अनेक मोठ्या शहरात दिसून आला. Downdetector या साईटने त्याचे छायाचित्र दाखवले आहे. तर अनेक एअरटेल वापरकर्त्यांनी X वर आउटेजबद्दल पोस्ट करत याबद्दलची नाराजी व्यक्त केली. काहींनी सांगितले की, एअरटेल सीमवर चालणारे त्यांचे डिव्हाइस बऱ्याच काळापासून ‘नो नेटवर्क’ वर चालत आहे. तथापि, या आउटेजच्या कारणाबाबत सध्या एअरटेलकडून कोणतेही विधान नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसल्यानंतर अनेक वापरकर्त्यांना आउटेजबद्दल माहिती मिळाली.


Edited By Poonam Khadtale



Source link

Comments are closed.