देशातील बर्‍याच भागात एअरटेल सेवा विस्कळीत झाल्या आहेत

मोबाईल नेटवर्कसह इंटरनेट सेवेतही व्यत्यय

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशाच्या अनेक भागात रविवारी पुन्हा एकदा एअरटेल सेवा विस्कळीत झाल्याचे दिसून आले. बेंगळूर, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकातासह अनेक मोठ्या शहरांमध्ये एअरटेल वापरकर्त्यांना नेटवर्क सिग्नल मिळत नव्हते. सकाळी 11 वाजल्यापासूनच एअरटेल सेवांमध्ये इंटरनेट, कॉल आणि मेसेजिंग सेवांवर परिणाम झाला होता. नेटवर्कची ही समस्या रात्री उशिरापर्यंत कायम होती. ग्राहकांनी याबाबत कंपनीकडे नाराजी व्यक्त केली. एका आठवड्यात दुसऱ्यांदा एअरटेल सेवा बंद पडल्या आहेत. यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी देशभरातील एअरटेल वापरकर्त्यांना सिग्नलशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागले होते.

Comments are closed.