ऐश्वर्या रायने दिल्ली उच्च न्यायालय
एआय जनरेटेड फेक छायाचित्रांचा वापर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विनाअनुमती व्यावसायिक लाभासाठी छायाचित्रांचा होत असलेल्या वापराच्या विरोधात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिका दाखल करत ऐश्वयाने स्वत:च्या खासगीत्व अधिकारांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. एआय जनरेटेड छायाचित्रांचा वापर कॉफी मग आणि अन्य उत्पादनांच्या विक्रीसाठी करण्यात आल्याचे तिने याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी सुनावणी आता 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.
स्वत:चे नाव, छायाचित्रांचा अनधिकृत वापर वाणिज्यिक उत्पादनांवर होऊ नये अशी तिने मागणी केली आहे. ऐश्वर्याच्या छायाचित्रांचा वापर व्यावसायिक लाभ आणि अनुचित सामग्रीसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक वेबसाइट्स चुकीच्या पद्धतीने स्वत:ला ऐश्वर्याचे अधिकृत प्लॅटफॉर्म म्हणून सादर करत लोकांची दिशाभूल करत असल्याचा युक्तिवाद ऐश्वयाच्या वतीने वरिष्ठ वकील संदीप सेठी यांनी उच्च न्यायालयात केला.
ऐश्वर्या नेशन वेल्थ नावाच्या कंपनीने स्वत:च्या अधिकृत दस्तऐवजांमध्ये ऐश्वर्याला चुकीच्या पद्धतीने अध्यक्षाच्या स्वरुपात सुचीबद्ध केले होते, तर प्रत्यक्षात या कंपनीशी ऐश्वर्याचा कुठलाच संबंध नव्हता. ऐश्वर्याची एआय जनरेटेड अश्लील छायाचित्रे, ऑनलाइन स्वरुपात प्रसारित करण्यात आली आहेत. यामुळे तिच्या प्रतिष्ठेला धक्का बसत असल्याचे म्हणत वकिलाने या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
Comments are closed.