Ranji Trophy; अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकाने बीसीसीआयचे लक्ष वेधले

सध्या रणजी ट्राॅफी (Ranji Trophy 2025) अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान रणजी ट्रॉफीचा उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे. मुंबई संघ हरियाणाविरुद्ध क्वार्टर फायनल सामना खेळत आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने बीसीसीआयला (BCCI) आरसा दाखवला आहे. त्याने शानदार शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले, जिथे भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता रहाणेच्या कामगिरीने पुन्हा एकदा निवडकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण केला आहे.

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मुंबईचा कर्णधार आहे. रणजी ट्रॉफी हंगामात रहाणे जम्मू आणि काश्मीरविरुद्ध अपयशी ठरला जिथे मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. पण आता त्याने पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात केली आहे. मेघालयविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रहाणेने 96 धावांची शानदार खेळी केली. पण दुर्दैवाने त्याचे शतक हुकले. पण त्याने हरियाणाविरुद्ध शतक झळकावून भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे.

रणजीमध्ये रहाणे एकामागून एक शतके झळकावत आहे. अलिकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रहाणेने आपल्या जबरदस्त फॉर्मने सर्वांना आश्चर्यचकित केले. मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने 8 डावात 469 धावा केल्या. दरम्यान तो 98 आणि 95च्या धावांवर दोनदा बाद झाला, तर 84 धावांची एक खेळी देखील त्यात समाविष्ट होती. त्यामुळे तो पुन्हा एकदा भारतीय संघात परततो की नाही? हे पाहणे देखील उत्सुकतेचं ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ स्टार खेळाडूमुळे गौतम गंभीरवर भडकला माजी दिग्गज! म्हणाला…
IPL 2025; आयपीएलचे वेळापत्रक कधी जाहीर होणार?
Champions Trophy: जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर आज होणार अंतिम निर्णय!

Comments are closed.