IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यातून श्रेयस अय्यरला का वगळले? आगरकर म्हणाले…
India’s Test squad for England tour announced: पुढील महिन्यात इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी (24 मे) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतीय संघाच्या कसोटी कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलकडे देण्यात आली आहे. (Shubman Gill India’s New Test Captain) परंतु, स्टार खेळाडू श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. (Shreyas Iyer not selected in Indian team) अय्यरल भारतीय संघात स्थान का देण्यात आले नाही? यावर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीवर 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारतासाठी हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूप महत्वाचा दौरा आहे. पण या दौऱ्यावर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, अष्टपैलू अक्षर पटेल, सर्फराज खान, श्रेयस अय्यरसारख्या स्टार खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय.
श्रेयस अय्यरला भारताच्या कसोटी संघात संधी मिळेल असे वाटत होते पण तसे झाले नाही. त्यावर बोलताना भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर म्हणाले, “श्रेयस अय्यर देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला खेळला आहे, पण सध्या त्याला कसोटी संघात जागा नाही.” (Ajit Agarkar speaks on Shreyas Iyer not getting a chance in the Indian Test team)
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा 18 सदस्यीय संघ– शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव
शुबमन गिल-एलईडी #Teamindia अॅक्शन-पॅक चाचणी मालिकेसाठी सज्ज आहेत 💪
इंग्लंडच्या इंडिया पुरुषांच्या दौर्यासाठी पथकाचा एक नजर 🙌#ENGVIND | @Shubmangill pic.twitter.com/y2cnqowipq
– बीसीसीआय (@बीसीसीआय) मे 24, 2025
Comments are closed.