रशियाच्या अवकाशात माऊलीचा गजर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कल्याणचे पॅराजंप व स्कायडायव्हर अजित कारभारी यांनी वारकरी पेहराव परिधान करून रशियात 12 हजार फूट उंचीवरून पॅराशूट जंप केला. या वेळी त्यांनी ‘राम कृष्ण हरी’चा जयघोष करत विठ्ठल प्रतिमेचा ध्वज आकाशात फडकवून वारकरी परंपरेचे दर्शन जगाला घडवले. रशियन मिलिटरीचे मुख्य प्रशिक्षक कोस्त्या क्रिवोत्सिव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा साहसी उपक्रम केला. भक्ती, सकारात्मकता, युवकांचे सक्षमीकरण आणि समाजकल्याणचा संदेश देण्यासाठीच हे साहस केल्याचे अजित कारभारी यांनी सांगितले.

Comments are closed.