हिंमत असेल तर व्हीएसआर कंपनीला कुलूप लावा; रोहित पवार यांचे आव्हान
अजित पवारांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी घातपाताचा आरोप केला आहे. व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा आरोपही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. तसेच या प्रकरणाच्या आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणीही केली. ब्लॅक बॉक्स आणि इंधनाच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पारदर्शक तपासाची गरज रोहित पवारांनी व्यक्त केली.
तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे, पण त्यांचा वेग कमी आहे, असे ते म्हणाले. ब्लॅक बॉक्स, फ्युएल टँक याबाबतही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सत्ताधारी व्हीएसआर कंपनीला वाचवायचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. दादा गेले त्याचं काही नाही. पण पैसा वाचला पाहिजे. मैत्री टिकली पाहिजे म्हणून या कंपनीला मदत केली जात आहे. या कंपनीवर बंदी घातली पाहिजे असंही रोहित पवार म्हणाले. हिंमत असेल तर व्हीएसआर कंपनीला कुलूप लावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
सरकारकडून या घटनेचा नीट तपास होत नाही, अशी नाराजी दर्शवत त्यांनी असमाधान व्यक्त केलं आहे. मुंबईतील वाय बी. चव्हाण सभागृहात रोगित पवार यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत या अपघाताशी संबंधित अनेक शक्यता वर्तवल्या. या संपूर्ण अपघाताची चौकशी झाली पाहिजे. सीबीआयला चौकशी दिली, सीआयडी घेतलीच आहे, ते ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. डीजीसीए आहे, त्यांची इंटर्नल इनव्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे, हरकत नाही. पण देशाबाहेरच्या 2 एजन्सी घेतल्या पाहिजेत,आणि त्या सर्व एजन्सीना रिपोर्ट करण्यासाठी एक मॉनिटरिंग एजन्सी असावी. रिपोर्टिंगसाठी एक कमिटी फॉर्म करा अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
व्हीएसारला पाठबळ दिलं जातंय असा आरोप त्यांनी केला. तुमच्याकडे सत्ता आहे, त्या सत्तेचा वापर करून व्हीएसआरला आत्ताच्या आत्ता कुलूप लावण्याची धमक दाखवा असं थेट चॅलेंज रोहित पवार यांनी दिलं. आज अजित दादा असते आणि आज त्यांच्या कुटु्ंबात, राष्ट्रवादी परिवारत जर अशी घटना घडली असती तर दादा थेट म्हणाले असते की राजकारण बाजूला, आत्ताच्या आत्ता व्हीएसआर बंद करा, ही दादांची धमक होती. ही धमक मात्र आज सत्तेत असलेल्या लोकांकडून दिसावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Comments are closed.