अजित पवार यांचे विमान झाडाला धडकलं, 22 पानांचा प्राथमिक अहवाल आला समोर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अजित पवार यांच्या विमान अपघातास एक महिना पूर्ण होत असताना नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) या घटनेचा 22 पानी प्राथमिक तपास अहवाल आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून अपघातासंदर्भातील काही महत्त्वाची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अहवालानुसार, अपघातावेळी विमानाने प्रथम एका झाडाला धडक दिली आणि त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. अपघाताच्या वेळी परिसरातील दृश्यमानता सुमारे 2 हजार मीटर इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) उष्णतेमुळे खराब झाल्याचे प्राथमिक निष्कर्षात स्पष्ट करण्यात आले आहे. अपघातामुळे कॉकपीट आणि एफडीआर यंत्रणेला मोठे नुकसान झाले असल्याची नोंदही अहवालात आहे.

ब्लॅक बॉक्स आणि कॉकपीटमधील डेटा तपासण्यासाठी अमेरिकेतील संबंधित कंपनीची मदत घेण्यात येणार आहे. ब्लॅक बॉक्स तयार करणाऱ्या अमेरिकन कंपनीचे तज्ज्ञ भारतात येऊन तांत्रिक तपासणी करतील, अशी माहिती देण्यात आली आहे. उपलब्ध यंत्रणांमधून काही रॉ डेटा डाऊनलोड करण्यात आला असून त्याचे सखोल विश्लेषण सुरू आहे. या विश्लेषणातून अधिक तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेला हा अहवाल प्राथमिक स्वरूपाचा असून अपघाताच्या नेमक्या कारणांसाठी अंतिम अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तपास यंत्रणांकडून पुढील चौकशी सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments are closed.