अरे इथं शिस्तचं नाही, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात अजितदादांनी टोचले उपस्थितांचे कान; नेमक

अजित पवार: माझा उल्लेख शिस्तप्रिय अजित दादा असा केला, पण मी आल्यापासून पाहतोय इथं काही शिस्त दिसत नाहीये. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट उपस्थितांचे शिक्षकाप्रमाणे कान टोचले. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण राज्यातील शासकीय, निमशासकीय शाळा आणि अंगणवाडीतील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलीची सर्वांगीण आरोग्य तपासणी करिता ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातून ते बोलत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात समन्वयाचा अभाव असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी बोलून दाखवले.

नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात अनेक विद्यार्थी उपस्थित होते. सकाळी लवकर हे विद्यार्थी आल्यानं त्यांची सहनशीलता संपली होती, त्यांचा गोंधळ सुरु होताच. दुसरीकडे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या आयोजनात देखील समन्वय दिसत नव्हता. अशातच सूत्र संचालन करणाऱ्या महिलेने अजित पवारांचा उल्लेख शिस्तबद्ध अजित दादा केला, हाच धागा पकडत अजित पवारांनी उपस्थित सर्वांचे कान टोचले. माझा उल्लेख शिस्तप्रिय अजित दादा असा केला, पण मी आल्यापासून पाहतोय इथं काही शिस्त दिसत नाहीये, असे त्यांनी म्हटले.

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना मजबूत करणे गरजेचे

अजित पवार पुढे म्हणाले की, कर्करोग, कुपोषित बालक असे विविध आजार चिंतेची बाब आहे. बालकांचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर निरोगी आयुष्य करणे गरजेचे आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या या विद्यार्थ्यांना मजबूत करणे गरजेचे आहे. लोणावळ्यात सहलीला आलेल्या एका शाळकरी मुलाला हृदय विकाराचा धक्का बसला, जर आधीच मुलाला हृदयाचा त्रास आहे. याची कल्पना असती तर कदाचित असे घडले नसते. त्यामुळे वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे, वेगवेगळ्या चाचण्या करणे आणि उपचार घेणे ही काळाची गरज आहे.

आरोग्य आणि शिक्षण विभागाने समन्वय राखला असता तर….

दरम्यान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात समन्वयाचा अभाव असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी बोलून दाखवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शंभर दिवसांचा उपक्रम राबवला जातोय. हा कार्यक्रम त्याच्याच एक भाग आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागात अधिकच समन्वय दिसला असता, अधिकची चर्चा झाली असती तर या कार्यक्रमाला राज्यव्यापी स्वरूप देता आले असते, अशी खंत व्यक्त करत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. दरम्यान, दादा भुसे यांच्या नाराजीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता आपल्याला समन्वय कुठे दिसला नाही? मी त्यांच्याशी बोलेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

https://www.youtube.com/watch?v=uiabcf6_mhw

आणखी वाचा

Manikrao Kokate :कोकाटेंचं राजकीय भवितव्य आज ठरणार! शिक्षेच्या स्थगितीवर होणार फैसला; मंत्रिपद राहणार की जाणार? याकडे लक्ष

अधिक पाहा..

Comments are closed.