Ajit Pawar clarifies that Shiv Sena MLAs were not invited to Raigad DPDC meeting


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज रायगडच्या जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) आढावा बैठक दूरदृष्यप्रणालीच्या (ऑनलाइन) माध्यमातून घेतली. या बैठकीसाठी रायगडमधील शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांना निमंत्रित न केल्यावरून नाराजीनाट्य रंगले होते. शिंदेंच्या आमदारांना डावलले जातेय का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद रंगला आहे. रायगडचे पालकमंत्रिपद आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फिल्डिंग लावण्यात येत आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज रायगडच्या जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) आढावा बैठक दूरदृष्यप्रणालीच्या (ऑनलाइन) माध्यमातून घेतली. या बैठकीसाठी रायगडमधील शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांना निमंत्रित न केल्यावरून नाराजीनाट्य रंगले होते. शिंदेंच्या आमदारांना डावलले जातेय का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar clarifies that Shiv Sena MLAs were not invited to Raigad DPDC meeting)

माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, वार्षिक जिल्हा आणि नियोजन बैठकीत पुढच्या वर्षी आपल्याला एखाद्या जिल्ह्याला किती कोटी रुपये द्यायचे आहे, हे ठरवण्यात येते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे कसे ठरतं? तर तिथले भौगोलिक क्षेत्र, तिथली लोकसंख्या, तिथले उत्पन्न, तिथला मानवविकास निर्देशांक अशा सगळ्या गोष्टी आपण एकत्र करतो आणि ठरवतो. मात्र मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, त्यामुळे तिथे आपण जरा झुकतं माप देतो. तसेच नागपूर उपराजधानी आहे म्हणून तिथेही झुकतं माप देतो. याशिवाय जिथे आकांक्षी जिल्हे किंवा तालुके आहेत, तिथेही आम्हाला जास्तीचा निधी द्यावा लागतो, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

हेही वाचा – Raigad DPDC Meeting : निमंत्रण नसल्याने शिवसेनेच्या आमदारांचा संताप, शिंदेंनी दिली प्रतिक्रिया

रायगडच्या डीपीडीसी बैठकीत शिवसेनेच्या आमदारांना निमंत्रन नसल्याच्या नाराजीनाट्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मी टीव्हीवर बघितलं की, रायगडच्या एकाही आमदाराला बैठकीला बोलावलं नाही. पण खरं सांगायचं तर शिवसेनेच्या आमदारांना बोलावलंच नव्हतं. कारण या बैठकीला मी तिथे स्वत: होतो आणि दोन्ही मंत्री म्हणजेच मंत्री भरत गोगावले व मंत्री आदिती तटकरे यांना बोलावलं होतं. या बैठकीला पालक सचिव, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, डीपीओ उपस्थित असतात. पण काही माहिती घ्यायची नाही आणि बातम्या चालवायच्या असे म्हणत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा – Gogawale : अजितदादांकडून ‘DPDC’ बैठकीला निमंत्रण नव्हते? शिंदेंच्या आमदारांना डावलले जातंय? भरत गोगावले म्हणाले…



Source link

Comments are closed.