Ajit Pawar Delhi Election Results 2025 BJP Won And AAP Loss
ही सुरुवात आहे. मिळालेल्या अपयशाचं विश्लेषण करुन भविष्यात देशपातळीवर पक्षबांधणीसाठी अधिक मेहनत घेतली जाईल, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्लीतील पराभवावर भाष्य केलं आहे.
Ajit Pawar Delhi Election Results 2025 मुंबई : ही सुरुवात आहे. मिळालेल्या अपयशाचं विश्लेषण करुन भविष्यात देशपातळीवर पक्षबांधणीसाठी अधिक मेहनत घेतली जाईल, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्लीतील पराभवावर भाष्य केलं आहे. सोशल मीडियावरील एक्सवर पोस्ट करत अजित पवारांनी दिल्लीतील पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, दिल्लीत विजय मिळवलेल्या भाजपचंही कौतुक केलं आहे. (Ajit Pawar Delhi Election Results 2025 BJP Won And AAP Loss)
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. राष्ट्रीय पक्ष ठरण्यासाठी अजित पवारांसाठी दिल्ली विधानसभेची निवडणूक महत्वाची होती. मात्र दिल्ली विधानसभेत खातं उघडणं अजित पवारांसाठी अशक्य झालं. अजित पवारांनी दिल्ली विधानसभेच्या रिंगणात 23 उमेदवार उतरवले होते. परंतु, त्या 23 उमेदवारांचा पराभव झाला असून, एकूण उमेदवार मिळून अजित पवारांना केवळ 0.03 टक्के मतं पडली आहेत. त्यामुळे सर्व उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
“राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळालं नसलं तरी या निवडणुकीतून आम्हाला खुप शिकायला मिळालं आहे. ही सुरुवात आहे. मिळालेल्या अपयशाचं विश्लेषण करुन भविष्यात देशपातळीवर पक्षबांधणीसाठी अधिक मेहनत घेतली जाईल. दिल्लीसह इतर अन्य राज्यात पक्षाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल”, अशा शब्दांत अजित पवार यांनी दिल्लीतील पराभवावर प्रतिक्रिया दिली.
“दिल्ली विधानसभेतील निर्णायक विजयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांचं मनापासून अभिनंदन करतो. दिल्लीत स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा देतो. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’चा प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपला मिळालेल्या 40 हून अधिक जागा या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचं प्रतिक आहेत. केंद्र आणि दिल्ली विधानसभेतही प्रधानमंत्र्यांच्या विचारांचं डबल इंजिन सरकार आल्यानं दिल्लीच्या सर्वांगीण विकासाला दुप्पट गती मिळेल. चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, उत्तम शिक्षण, दर्जेदार आरोग्य सुविधांचं, देशाच्या राजधानीचं सर्वांगसुंदर शहर हे दिल्लीकरांचं स्वप्न पूर्ण होईल. दिल्लीतील भाजपच्या यशामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कष्ट व निवडणूक व्यवस्थापनाचंही मोठं योगदान आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव आणि त्यांच्या टीमनं घेतलेली मेहनतही महत्वाची ठरली”, असं म्हणत अजित पवार यांनी भाजपचं कौतुक केलं.
हेही वाचा – Narendra Modi : लोकशक्ती सर्वोपरि, विजयानंतर मोदींनी दिल्लीच्या जनतेचे मानले आभार
Comments are closed.