इंदापूरमध्ये अजित पवार गटाचा कार्यक्रम; दादांसह सुनेत्रा पवार बॅनरवरून गायब, राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवर पक्षाचे दिवंगत नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या फोटोंना कुठेही स्थान देण्यात आले नाही. हा कार्यक्रम तालुक्यातील इंदापूरमध्ये पार पडला. अजित दादा आणि सुनेत्रा पवार बॅनरवरून गायब असल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्काना उधाण आले आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या सदस्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात व्यासपीठावर लावण्यात आलेला बॅनरवर खासदार सुनील तटकरे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांचे फोटो ठळकपणे छापलेले होते. जिल्ह्यातील अन्य पदाधिकाऱ्यांसह नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनाही या बॅनरवर स्थान देण्यात आले होते. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या फोटोंना बॅनरवर कुठेही स्थान देण्यात आले नाही. सुनील तटकरे हे अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो बॅनरवर नसल्यामुळे उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Comments are closed.