नगरसेवक पदाच्या उमेदवाराला खुर्ची न दिल्याने अजित पवार संतापले; स्टेजवरून उठले अन् माईक घेऊन म्
जालना: जालन्यामध्ये नगरसेवक पदाच्या उमेदवाराला खुर्ची न दिल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार संतापले.अजित पवारांनी (Ajit Pawar) माईक हातात घेत पोलिसांना देखील सुनावलं. डी झोनमध्ये उमेदवारांना येऊ देण्याची ताकीद त्यांनी यावेळी दिली आहे. त्याचबरोबर अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्त्यांना देखील झापलं आहे. व्यासपीठासमोर उमेदवारांना खुर्च्या देऊन बसवण्याचं आवाहन देखील अजित पवारांनी (Ajit Pawar) केलं आहे. जालन्यामध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. (Ajit Pawar got angry after not giving a chair to a candidate for the post of corporator)
Ajit Pawar: नेमकं काय घडलं?
व्यासपीठावरती सर्वजण बसलेले होते, माईकसमोर एक जण माहिती देत होता, त्यावेळी अचानकपणे अजित पवार (Ajit Pawar) उठले आणि त्यांनी माईक हातात घेतला आणि म्हणाले, मला पोलिसांना आणि सगळ्यांना सांगायचं आहे. माझे जे उमेदवार आहेत, त्यांच्या खुर्च्या इथे समोर व्यासपीठासमोर लावा. मी सांगतो आहे, घ्या त्या खुर्च्या आणि समोर लावा. काढा त्या खुर्च्या कार्यकर्त्यांनो उठा. काढा त्या खुर्च्या, कळतं नाही काय, उमेदवार कोण आहेत, त्यांना इथे समोर बसवा,ये इकडे लावा खुर्च्या, चला, इकडे, समोर लावा खुर्च्या, सगळे उमेदवार पुढे या, सांगितलेलं कळतं नाही काय, खुर्च्या घ्या पटापट असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) संताप व्यक्त केला.
Ajit Pawar: अजित पवारांचं अनवधानाने वक्तव्य अन् लगेच दिलगिरी
दरम्यान भाषणावेळी अजित पवारांचे (Ajit Pawar) (अनवधानाने) हिंदवी स्वराज्याची स्थापना यशवंतराव चव्हाणांनी केल्याचे वक्तव्य तोंडून आले, त्यानंतर लगेचच अजित पवारांनी भाषणात दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर बोलताना म्हणाले, बरीच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी होऊ शकल्या नाहीत याची मला खंत आहे. अनेक सहकारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पुढे आले. देश कोणाच्या हातात घ्यायचा हा देशातील मतदार घेतो, स्थानिक निवडणूका या जातीपातीच्या नावाने होत नाहीत. मी शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने पुढे गेलेला कार्यकर्ता आहे. मी काम करतो, बारामतीमध्ये आठ-आठ वेळा निवडून येतो. काल बारामतीमध्ये 8 लोक बिनविरोध निवडून आले खर तर 10 आली असते. पण तीन वाजून गेले,आज राज्याचं अर्थकारण मी बघतो राज्याची तिजोरी माझ्याकडे आहे, नुसते नियोजन करून विकास करणे चालत नाही, तो सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे, असंही अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.