Ajit pawar got angry on the issue of loan waiver and told the journalist that even if you become the Chief Minister tomorrow, it is not possible


शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी (02 मे) विचारले असता, त्यांनी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिले आहे का? नाही ना…, असे म्हणत हात वर केले होते. यानंतर आज (03 मे) त्यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. हे आश्वासनाबाबत महायुतीच्या जाहीरनाम्यातही लिहिण्यात आले होते. पण महायुतीची सत्ता येऊन 100 दिवस होऊन गेले असले तरी अद्यापही सरकारकडून कर्जमाफीबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी (02 मे) विचारले असता, त्यांनी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिले आहे का? नाही ना…, असे म्हणत हात वर केले होते. यानंतर आज (03 मे) त्यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit pawar got angry on the issue of loan waiver and told the journalist that even if you become the Chief Minister tomorrow, it is not possible)

शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच नाही, हा महायुतीचा ठाम निर्णय आहे का? असा प्रश्न विचारताच अजित पवार भडकले. असं तुला कोणी सांगितलं? असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारालाच विचारला. अजित पवार म्हणाले की, उद्या तू जरी मुख्यमंत्री झाला तरी तसा निर्णय घेऊ शकत नाही. त्या-त्या वेळची परिस्थिती बघून, शेतकऱ्यांचं नैसर्गिक संकट काय आहे? हे सर्व बघून निर्णय घेतले जातात, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

हेही वाचा – Ajit Pawar : कर्जमाफीची घोषणा निवडणुकीचा जुमला; काय म्हणाले अजितदादा?

अजित पवार म्हणाले की, मागे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला. युपीएचं सरकार केंद्रात असताना त्यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे सरकार स्थापन केलं, त्यावेळेस कर्जमाफीचा निर्णय झाला. आतापर्यंत महाराष्ट्रात तीनवेळा कर्जमाफीचे निर्णय झाले, ही गोष्ट आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही. आजच्या घडीमध्ये काही गोष्टी प्रत्यक्षात कृतीत आणण्याकरता काही अडचणी येत असतील, तर त्याचा व्यवस्थितपणे विचार करू. ज्यावेळेस आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला झेपेल आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकास कामावर कोणताही परिणाम होणार नसेल, त्यावेळेस कर्जमाफीचा विचार करू, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Politics : अजित पवार गटात जाण्याचा दावा? सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया ट्विटरवर भिडल्या



Source link

Comments are closed.