2007 साली अजित पवारांचं भाकित आणि 2014 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान, नेमका काय आहे ‘तो’ किस्सा?
प्रमोद हिंदुराव: भविष्यात नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होतील असं भाकित राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी 2007 साली केलं होतं. याबाबतचा किस्सा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी शिर्डीच्या शिबिरात सांगितला आहे. त्यानंतर 2014 साली नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्याचे प्रमोद हिंदुराव म्हणाले.
नेमका ‘तो’ किस्सा काय?
इस्त्राईलला अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने मी आणि अजित पवार गेलो होतो. त्यावेळी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी देखील त्या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते. त्यावेळी मोदीजींनी 80 राष्ट्रांसमोर गुजरात राज्यातील एका प्रकल्पाबाबत प्रेझेंटेशन केलं होतं. एक्वा कल्चर एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर पॉवर या विषयात 2020 ला गुजरात राज्य कुठे असेल, त्यावेळी 80 राष्ट्रांनी नरेंद्र मोदी यांचा कौतुक केलं होतं असे प्रमोद हिंदुराव म्हणाले. त्याचवेळी अजित पवार यांनी भविष्यात नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होतील असं भाकीत केलं होतं असे प्रमोद हिंदुराव म्हणाले. तेच तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे 2014 साली देशाचे पंतप्रधान झाले. त्यामुळेच विकासाच्या मुद्द्यावर काही वर्षांपूर्वी आपण या दूरदृष्टी असलेल्या नेत्यासोबत गेल्याचे प्रमोद हिंदुराव आहे.
नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथम 2014 साली देशाचे पंतप्रधान झाले होते. त्यानंतर 2019 ला देखील तेच देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर यावेळच्या म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजप आणि मित्रपक्षांना चांगल यश मिळालं, त्यामुळं सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. नरेंद्र मोदी यांना ऑक्टोबर 2001 ते मे 2014 पर्यंतचा त्यांचा कार्यकाळ असलेला गुजरातचा सर्वाधिक काळ काम करणारे मुख्यमंत्री होण्याचा मान देखील आहे. दरम्यान, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या मागील दोन टर्म अनेक महत्त्वाच्या उपक्रमांनी चिन्हांकित केल्या आहेत. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ आणि ‘विकासाभिमुख आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन’ या ब्रीदवाक्यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला आहे. आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन धन योजना, सर्वांसाठी घरे, प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजना, उज्ज्वला योजना आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी, UDAN, मेक इन इंडिया यांचा त्यांच्या पुढाकारांमध्ये समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या:
Ajit Pawar: अजित पवार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; बारामतीत पुन्हा केला पहाटेच कामाचा पाहणी दौरा, पुढचं नियोजन सांगत म्हणाले, ‘जरा धीर धरा…’
अधिक पाहा..
Comments are closed.