Ajit Pawar held a meeting with the Finance and Planning and State Excise departments rrp


मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे, तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. यानंतर काही मंत्र्यांनी आजपासून मंत्रिपदाची सूत्रे हाती घेण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर करचोरी, करगळती रोखण्याच्या कर्तव्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. (Ajit Pawar held a meeting with the Finance and Planning and State Excise departments)

अजित पवार यांनी आज ‘वित्त व नियोजन’ आणि ‘राज्य उत्पादन शुल्क’ मंत्रिपदांची सूत्रे हाती घेतली. यानंतर त्यांनी मंत्रालयात दोन्ही विभागांसह शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त, नियोजन, उत्पादनशुल्क, प्रलंबित योजना, आवश्यक निधी आणि राज्याच्या उत्पन्नाचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी राज्यातील महसुली सुधारणा, शेती विकास, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यासारख्या विविध विषयांवर चर्चा केली. यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी वित्तीय योजना आणण्यावर भर देण्याच्या सूचना देताना राज्याच्या महसूल वाढीसाठी करचोरी, करगळतीसह गैरकारभार रोखण्याचे निर्देश दिले.

– Advertisement –

हेही वाचा – IAS Transfer : 12 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; हर्षदीप कांबळे ‘बेस्ट’चे जीएम, अनबाल्गन उद्योग सचिव

– Advertisement –

हयगय चालणार नाही

दरम्यान, अजित पवार बैठकीत म्हणाले की, करसंकलनाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्यात येतील, परंतु कामात कोणत्याही परिस्थितीत हयगय चालणार नाही. रिझल्ट ओरियंटेड काम करा, अशा अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच राज्यातील बेकायदा दारूविक्रीवर कडक निर्बंध आणण्यासाठी पारदर्शक व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा – Supriya Sule : बीड-परभणी प्रकरणात न्याय मिळाला नाही तर…, सुप्रिया सुळेंना भीती

हे अधिकारी बैठकीला उपस्थित

दरम्यान, अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ॲड. अशिष जयस्वाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वस्तू व सेवा कर विभागाचे राज्य आयुक्त आशीष शर्मा, वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) सचिव शैलजा ए, लेखा व कोषागारे विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपसचिव रविंद्र औटे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त विश्वनाथ इंदिसे, सहआयुक्त सुनील चव्हाण, अपर आयुक्त यतीन सावंत, उपायुक्त सुभाष बोडखे, उपायुक्त शंकर जगताप आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Edited By Rohit Patil





Source link

Comments are closed.