राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या हालचाली अमित शहांच्या ‘ग्रीन सिग्नल’नेच; अजितदादांच्या दिल्ली भेटीचा मोठा खुलासा
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण केले आहे. आता या संदर्भात एक खळबळजनक माहिती समोर आली असून, दोन्ही गट एकत्र येण्याच्या हालचाली खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संमतीनेच सुरू होत्या, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने केला आहे.
प्रवरा भेटीत ठरली रणनीती?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रवरा येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित शहा आणि अजित पवार यांची भेट झाली होती. या भेटीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. या चर्चेनंतरच विलीनीकरणाच्या हालचालींना खऱ्या अर्थाने वेग आला. शहा यांच्यासोबतच्या या चर्चेनंतर अजितदादांनी शरद पवार यांच्या गटातील नेत्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती.
तटकरे-पटेल यांना बाजूला ठेवून दिल्लीत खलबते
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा १४ नोव्हेंबर रोजी गाठला गेला. या दिवशी अजित पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या दिग्गज नेत्यांना बाजूला ठेवून थेट दिल्ली गाठली. तिथे त्यांनी पुन्हा एकदा अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर सविस्तर चर्चा झाली आणि शहा यांनी या प्रक्रियेला हिरवा कंदील (Green Signal) दाखवला.
बैठकांचा सिलसिला आणि दावा
अमित शहांची परवानगी मिळाल्यानंतरच अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गुप्त बैठकांचे सत्र वाढले होते. अजित पवारांनी निधनापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पावले उचलली होती, असा दावा आता शरद पवार गटाकडून केला जात आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीवर यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या नवीन दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
अजितदादांनी घेतलेले निर्णय त्यांच्यासोबतच गेले! सुप्रिया सुळे यांचा विलीनीकरण चर्चेला पूर्णविराम
अमित शहांच्या संमतीने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची बोलणी झाली: अजित पवार यांच्या निधनानंतर मोठा खुलासा
अमित शहा यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर दिवंगत अजित पवार यांनी दोन्ही गटांमधील विलीनीकरणाची चर्चा सुरू केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने (शरदचंद्र पवार) केला आहे.
Comments are closed.