मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचा भाऊही मैदानात

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून उमेदवारांच्या नावांची यादी निश्चित होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका (BMC निवडणूक) निवडणुकासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेत 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 100 उमेदवारांची यादी जाहीर होईल, अशी माहिती आमदार आणि नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी दिली होती. मात्र, पहिल्या यादीत 37 उमेदवारांना संधी देण्यात आली असून नवाब मलिक यांच्या भावासह कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, त्यांची सुन बुशरा मलिक आणि बहीण सईदा खान यांना महापालिकेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिकेत स्वबळाचा नारा दिला असून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, उद्यापासूनच या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटपही केले जाणार आहे. राष्ट्रवादीकडून मुंबई महापालिका निवडणुकांची जबाबदारी नवाब मलिक आणि आमदार सना मलिक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे, महायुतीपासून फारकत घेत राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे.

नवाब मलिक कुटुंबातील तिघांना उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मलिक कुटुंबातून यंदा 3 जण निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यात आले आहेत. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक प्रभाग क्रमांक 165, नवाब मलिक यांची बहीण डॉ सईदा खान प्रभाग क्रमांक 168 तर कप्तान मलिक यांची सून बुशरा नदीम मलिक प्रभाग क्रमांक 170 मधून निवडणुक लढणार आहेत. कप्तान मलिक यांचा प्रभाग 168 सध्या महिला राखीव झाल्याने कप्तान मलिक यांच्याकडून सुनेला स्वतः प्रभागात उतरवण्याचा निर्णय तर स्वतः साठी नवीन प्रभाग 165 मधून लढण्याचा निर्णय घेतला आहे.

शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत

दरम्यान शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत ठाकरे बंधूंसोबत एकत्र निवडणूक लढणार असल्याने तुतारी चिन्हावरील इच्छुकांची नाराजी झाली असून तिकीट मिळत नसल्याचे लक्षात येताच ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, ठाकरे बंधूंकडूनही लवकरच पहिली यादी जाहीर होऊ शकते, कारण शिवसेना उबाठा आणि मनसेच्याही जागावाटपाचं काम अंतिम टप्प्यात असून अवघ्या काही जागांवरुन चर्चा सुरू आहे. तर, शरद पवारांची राष्ट्रवादी देखील ठाकरे बंधूंसोबत मुंबईत एकत्र लढणार आहे. राष्ट्रवादीला 10 ते 12 जागा देण्यात येणार आहेत.

दरम्यान, दुसरीकडे भाजप-शिवसेना युतीचीही बोलणीही अंतिम टप्प्यात आली असून 20 जागांवर चर्चा सुरू आहे. भाजप 128 जागा शिवसेना 79 जागा अशा 207 जागांवर एकमत झालेला आहे उर्वरित 20 जागांची चर्चा सुरू आहे व राष्ट्रीय पातळीवर चर्चा होऊन घडलेल्या विविध जागांचा तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती आहे. भाजपकडून उद्या तेजस्वी घोसाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून आणखी 4 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे, पुढील काही तासांत उमेदवारांच्या नावाच्या याद्या जाहीर होणार आहेत.

हेही वाचा

मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला

आणखी वाचा

Comments are closed.