कुठणं या पुण्याचा पालकमंत्री झालो! कोणीही उठतो, उपदेश पाजतो; अजित पवार यांची हतबलता
पिंपरी-चिंचवडमधून वाहणाऱ्या मुळा नदी सुशोभीकरणासाठी अडथळा ठरणारी एक हजार झाडे तोडण्यात येणार असून, पालकमंत्री म्हणून ती रोखावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केल्यानंतर अजित पवार भलतेच चिडले. कोणीही उठतो, उपदेश पाजतो. हे सगळं ऐकल्यावर कुठणं या पुण्याचा पालकमंत्री झालो, असं वाटतं, अशी हतबलता पवार यांनी व्यक्त केली.
चिंचवड येथे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, शहराध्यक्ष योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, राहुल भोसले, राजेंद्र जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कुठणं या पुण्याचा पालकमंत्री झालो! कोणीही उठतो, उपदेश पाजतो; अजित पवार यांची हतबलता #Ajitpawar #pune #सॅमाना pic.twitter.com/yfpev0jv8z
– सामाना ऑनलाईन (@सॅमानाऑनलाइन) 9 ऑगस्ट, 2025
उपमुख्यमंत्री पवार यांचे भाषण संपत असताना सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुळा नदी सुशोभीकरणासाठी होणारी वृक्षतोड, दुर्गादेवी टेकडीसह शहरात विविध ठिकाणी अनधिकृतपणे वृक्षतोड होत आहे. आपण पालकमंत्री आहात. पालकमंत्री म्हणून शहरात होणारी वृक्षतोड रोखावी अशी विनंती भापकर यांनी केली. त्यावर हे सगळं ऐकल्यावर कुठणं या पुण्याचा पालकमंत्री झालो, असं मला वाटतं. सर्व मक्ता मीच घेतला आहे. कोणीही उठतो, उपदेश पाजतो, असे पवार म्हणाले.
दादा म्हणाले, पुण्यात 3 नव्या महापालिका हव्यात; फडणवीस म्हणतात एकच हवी; महायुतीत ताळमेळ जुळेना
Comments are closed.