उड्डाणापूर्वी पायलटनं मद्यपान केलेलं?, शेवटचा संवाद ते विमानाचा स्फोट; अजितदादांच्या अपघाताचा 2

अजित पवार विमान अपघात अहवाल: राज्याचे दिवंगत उमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला 28 जानेवारीला अपघात (Ajit Pawar Plane Crash) झाला. या घटनेच्या 1 महिन्यानंतर विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला. विमान अपघात चौकशी प्राधिकरणाकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. (Ajit Pawar Plane Crash Report)

बारामती विमानतळावर अजित पवारांचं विमान सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी कोसळल्याची माहिती मिळाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. सुरुवातीला हे विमान झाडावर आदळलं. त्यानंतर जमिनीवर कोसळलं. ही घटना घडली तेव्हा बारामती विमानतळावर 3 हजार मीटर दृश्यमानता होती,असं अहवालात नमूद करण्यात आलं. तर, उड्डाणापूर्वी पायलटनं मद्यपान केलं नव्हतं, असंही अहवालात म्हटलंय. मात्र, बारामती विमानतळावर सुविधा अपुऱ्या असल्याचा ठपका, या अहवालात ठेवण्यात आला आहे. (Ajit Pawar Plane Crash Report)

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या प्राथमिक अहवालात काय काय? (Ajit Pawar Plane Crash Report)

  1. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडून प्राथमिक अहवाल प्रसिद्ध
  2. लॅंडिंगवेळी दृश्यमानता फक्त 3 किलोमीटर, VFR नियमांनुसार आवश्यक किमान दृश्यमानता 5 किमी गरजेचे
  3. उपग्रह चित्रांनुसार परिसरात हलके धुके
  4. बारामती हे अनियंत्रित एअरफिल्ड, रनवे मार्किंग फिकट, सैल खडी, रनवे बाजूस विंडसॉक नाही, संरक्षक भींत अपुरी सारख्या त्रुटी आढळल्या
  5. पहिल्या प्रयत्नात गो-अराउंड, दुसऱ्या प्रयत्नात रनवे वर लँडिंग क्लीअरन्स, पायलटने “Field in sight” कळवलं
  6. अंतिम क्षणी कॉकपिटमधून “Oh S**t…” असा आवाज
  7. विमान रनवेच्या डाव्या बाजूला सुमारे 50 मीटर अंतरावर कोसळले
  8. दोन्ही पायलट यापूर्वी बारामती येथे उड्डाण करून गेले होते आणि त्यांना त्या विमानतळाच्या भौगोलिक रचनेची पूर्ण माहिती होती
  9. दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर्स म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर (SSFDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (SSCVR) हे विमानाच्या अवशेषांतील त्यांच्या मूळ जागी
  10. दोन्ही रेकॉर्डर्स अवशेषांमधून बाहेर काढण्यात आले असून, डेटा पुनर्प्राप्ती आणि पुढील विश्लेषणासाठी पाठवला
  11. अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर्स उच्च तापमानाच्या संपर्कात आल्यामुळे उपकरणांना उष्णतेमुळे नुकसान
  12. फ्लाईट डेटा रेकाॅर्डरचा डेटा यशस्वीपणे डाऊनलोड
  13. काॅकपिट व्हाॅइस रेकाॅर्डर डेटा डाउनलोड करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री व तांत्रिक कौशल्य हे निर्मिती करणाऱ्या कंपनीकडे, अशात अमेरिकेच्या मानांकननुसार डेटा रिट्रॅक्ट केला जाणार
  14. प्रवासाआधी दोन्ही वैमानिकांकडून मद्यपान करण्यात आलं नव्हतं, टेस्ट निगेटिव्ह

रिपोर्टमधील AAIB च्या महत्त्वाच्या शिफारसी काय? (Ajit Pawar Plane Crash Reason)

  1. अनियंत्रित एअरफिल्डवर VFR (व्हिज्युअल फ्लाईट्स रुल) नियमांचे काटेकोर पालन गरजेचे…
  2. हवामान निकष पूर्ण नसल्यास उड्डाणास परवानगी देऊ नये…
  3. मूलभूत हवामान सुविधा व लँडिंग सहाय्य वाढवावे…
  4. अशा एअरफिल्डचे परवाना प्रणालीचा विचार अंशी देखील शिफारस…

संबंधित बातमी:

Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल जाहीर; VFR नियमांचे उल्लंघन, कमी दृश्यमानता आणि सुरक्षा त्रुटी उघड

आणखी वाचा

Comments are closed.