अजितदादा म्हणाले… विलासराव माझे लाडके मुख्यमंत्री

महायुतीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाल्यानंतर वेळ न दडवता अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांना सर्वप्रथम मुख्यमत्री म्हणून पाठिंबा घोषित केला. असे असले तरी अजित पवार यांच्या मनातील लाडके मुख्यमंत्री मात्र विलासराव देशमुखच होते, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री पद भूषविण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे. त्यांनी विलासरावाबरोबरच कांग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे या मुख्यमंत्र्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदासोबतच राज्याचे अर्थमंत्री म्हणून ते नंबर 2 चे नेते म्हणून काम करत आहेत. मात्र, अजित पवार यांना लाडके मुख्यमंत्री कोण असे विचारले असता त्यांनी चटकन उत्तर दिले , विलासराव देशमुख. एका वृत्त वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला. कोणतीही घासाघीस न करता किवा वेळ न दडवता तुम्ही फडणवीस यांना पाठिंबा कसा दिला, असे विचारले असता ते म्हणाले, मी व्यवहारी आहे.
Comments are closed.