लक्ष्मण हाकेंचा बारामती बँकेवर अन् दादांवर गंभीर आरोप, अजितदादांकडून खरपूस समाचार; म्हणाले, तस


लक्ष्मण हॅकवरील अजित पवार: बारामती बँकेमध्ये (Baramati Bank) मराठा समाजाची अण्णासाहेब महामंडळातून मोठ्या प्रमाणात कर्ज मंजूर होतात, असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला होता. आता लक्ष्मण हाकेंचा आरोपावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतून प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार म्हणाले की, राज्यात अतिवृष्टी झाली आहे. अजून चार दिवस रेड अलर्ट राहण्याची शक्यता आहे. यात मोठं नुकसान झालं आहे. नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. निर्सगाची अवकृपा झाल्यावर काय होऊ शकते हे आपण पाहिले आहे. 1 हजार साडी, परकर असे 5 ट्रक पाठवायचे आहेत, असे मला एकाने सांगितले त्यानुसार आम्ही नियोजन करतो आहोत, असे त्यांनी म्हटले.

लक्ष्मण हॅकवरील अजित पवार

लक्ष्मण हाके यांनी बारामतीच्या ओबीसी मोर्चामध्ये बारामती बँकेवर आरोप केले होते. यावरून अजित पवार यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर निशाणा साधला. कोणतरी इथं बँकेच्या संदर्भात येतं आणि बोलतो. त्यांना माहिती अर्धवट असते. मी कधी जातीचा पातीचा विचार केला नाही. पण काहींनी भासवलं की, इथे ठराविक लोकांना कर्ज दिलं जातं. ठराविक लोकांचा प्रकरण केलं जातं. तसले आमच्या मनात पण येत नाही. आम्ही सगळे काम करतो. तुम्ही येता आणि भाषणं करता. खरं तर माध्यमांनी खाली टीप टाकावी लागेल, असे त्यांनी म्हटले.

मी कामाचा माणूस  (Ajit Pawar Speech)

बारामतीसाठी आज मी दोन कोटी रुपये मंजूर केले. आज बारामती शाळेसाठी काही पैसे उपलब्ध केले, काय केलं? कसं केलं ते विचारू नका. गरिबांची पोरं शिकली पाहिजेत. उर्दू शाळेला साडेचार कोटी मंजूर केले. सकाळी 6 वाजता उठून काम करतो, काल आणि परवा दुपारी जेवलो नाही. काल कारखान्यावर कोण काहीतरी आणून द्यायचं, आणि मी खायचो. आज सकाळी वेगवेगळ्या कामासाठी बारामतीत 25 कोटी मंजूर केले. कामाच्या बाबतीत आपला हात कुणीच धरू शकत नाही. मी कामाचा माणूस आहे, असे देखील अजित पवारांनी म्हटले.

एमआयडीसी परिसरात 78 कोटीच्या स्टेडियमला मंजुरी (Ajit Pawar Speech)

अजित पवार पुढे म्हणाले की, बारामतीतील एमआयडीसी परिसरात 78 कोटीच्या स्टेडियमला मंजुरी दिली आहे. बारामतीत मला इंदूरच्या धर्तीवर जायचं आहे. चाकण, बारामती आणि लोणावळा ही 3 शहरे निवडली आहे. नितीन करीर हे रिटायर झाले त्यांनी सांगितले की मी लोणावळामध्ये लक्ष देईल. 60 व्या वर्षी रिटायर व्हा. पण, काम करायला मदत करा ना. कुणी अंडी विकायला बसत आहे, हे असलं मला चालणार नाही. ज्यांना विकायचं आहे त्यांनी गाळे घ्या. मला आईला बघितली की स्फूर्ती येते. जास्त काम करावंसं वाटतं. रात्री आईला भेटून येत होतो. तेव्हा लाईट बंद होती. लगेच चालू केली. जरा पाऊस पडला की लगेच दाखवतात बघा बारामती पाण्यात. काहीजण महिला भगिनींना सांगतात. पाण्यातून गाडी घालून मी शूटिंग काढतो.अगं थोडं पलीकडून जाणार मी तुला लाडकी लाडकी लाडकी म्हणून तू दोडकी सारखी वागायला लागली. मी प्रतिनिधित्व करायचं बंद केल्यावरती तुम्हाला कळेल म्हणतात ना पिकत तिथे विकत नाही. तुम्हाला असा आमदार मिळणार नाही. मागच्या आमदारांवरती टीका करायची नाही. त्यांना देशाचा आणि राज्याचा व्याप होता. मला तुलना करायची नाही, असे देखील त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

Tamil Nadu Stampede TVK Vijay Rally: दहा हजार ऐवजी तीन पट जास्त लोक पोहोचले; विजयच्या रॅलीतील चेंगराचेंगरीने देश हादरला, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.