Ajit Pawar Swargate Bus Depot Rape Case Pune Police Maharashtra News In Marathi
नांदेड : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये घडलेल्या घटनेचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राज्यात शक्ती कायदा लागू करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी केली जात आहे. आज कोर्टातही त्याला हजर केलं जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण वस्तुस्थिती समोर येईल, असे अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar Swargate Bus Depot Rape Case Pune Police Maharashtra News In Marathi)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच नांदेडमधून माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पुण्यातील घटनेवर त्यांनी भाष्य केलं. त्यानुसार, “पुण्यातील घटनेचा सर्वांनीच निषेध केलेला आहे. त्या नराधमाला ताबडतोब अटक झाली पाहिजे, म्हणून आमचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर गुरूवार मध्यरात्री 1 वाजता त्याला अटक करण्यात आली”, असे अजित पवार म्हणाले.
“पोलिसांच्या ताब्यात सध्या आरोपी असून त्याची चौकशी केली जात आहे. आज कोर्टातही त्याला हजर केलं जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण वस्तुस्थिती समोर येईल. या घटनेच्या पार्श्वभूमीवर माझं सकाळीच पोलिसांसोबत बोलणं झालं आहे. या घटनेत आरोपीवर कारवाई केलं जाणार आहे”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
नाव न घेता अजित पवारांची राऊतांवर टीका
“ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेत आहात, तो रोज सकाळी 9 किंवा 10 वाजता बोलत असतात. त्यामुळे प्रत्येकाला उत्तर द्यायला, आम्ही बांधिल नाही आहोत”, असं म्हणत नाव न घेता अजित पवारांनी संजय राऊतांवर टीका केली.
Comments are closed.