Ajit Pawar warned that if the office bearer is number two then he must have gone into the ring


कार्यकर्ता संवाद मेळाव्यात अजित पवारांच्या उपस्थितीत 400 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.

परभणी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (26 एप्रिल) परभणी जिल्हा दौऱ्यावर होते. आज सकाळी त्यांनी परभणीच्या पोखरणी नरसिंह मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा नियोजनची बैठक संपन्न झाल्यानंतर अजित विकास कामांचे लोकार्पण केले. तर संध्याकाळी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात अजित पवारांच्या उपस्थितीत 400 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना इशारा दिला. (Ajit Pawar warned that if the office bearer is number two then he must have gone into the ring)

परभणी शहरातील अक्षता मंगल कार्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये विविध पक्षांच्या जवळपास 400 पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरांवर तयारी सुरू करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. ते असेही म्हणाले की, माझ्या पक्षाचा पदाधिकारी हा स्वच्छ व निर्व्यसनी असला पाहिजे. जर तो दोन नंबरवाला असेल तर त्याला मी सोडणार नाही, मग तो टायरमध्ये गेलाच म्हणून समजा, असा सज्जड दम अजित पवार यांनी मेळ्यावात भरला.

हेही वाचा – Pahalgam Attack : हिंदूंना मारल्यामुळे त्यांना भीती; अलगाववाद्यांचे आका म्हणत भाजपा नेत्याची शरद पवारांवर टीका

शेतकऱ्यांना सर्वतोपरी सर्व सहकार्य करत राहू

केंद्र सरकार महाराष्ट्राला 50 वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देणार आहे. आपला शेतकरी बांधव सुखाने रहावा, याकरिता वीजबिल माफी सरकारने देऊ केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडला (MSEDCL) राज्य सरकार आपल्या तिजोरीतून 17 ते 20 हजार कोटी रुपये देणे आहे. परंतु आम्ही सर्वतोपरी सर्व सहकार्य करत राहू, असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले.

हेही वाचा – Indus Water Treaty : पाकिस्तान ज्या पाण्यावर निर्भर आहे, ते जर अडवून ठेवलं तर…; फडणवीसांचा इशारा





Source link

Comments are closed.