आकाश आनंद बसपातून बाहेर
ईशान आनंदला मिळणार नवी जबाबदारी
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सोशल मीडिया अकौंटवर एक विस्तृत वक्तव्य करत पक्ष संघटन आणि उत्तराधिकारीवरून अनेक मोठ्या निर्णयांची घोषणा केली आहे. आकाश आनंद विवाहानंतर स्वत:चे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्या प्रभावाखाली आला आहे आणि त्याच्या कृत्यांमुळे त्याला पक्षापासून वेगळे करण्यात आले आहे. आकाश आनंदला पक्षात परत घेणे एक मोठा विश्वासघात असेल. आकाश आनंद आणि त्याच्या बहिणीला बसपमध्ये कुठलीच जबाबदारी दिली जाणार नसल्याचे मायावती यांनी स्पष्ट केले आहे.
तर बंधू आनंद कुमार यांचे कनिष्ठ पुत्र ईशान आनंद यांना पक्षात जबाबदारी दिली जाणार आहे. ईशानने पक्षविरोधी कृत्य केल्यास त्यालाही पक्षातून काढून टाकले जाणार आहे. अशास्थितीत परिवारातील एखाद्या अन्य सदस्याला जबाबदारी देण्याऐवजी दलित समाजाच्या एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिली जाणार असल्याची भूमिका मायावती यांनी मांडली आहे. तसेच त्यांनी 23 सप्टेंबर रोजी बसपची अखिल भारतीय स्तरावरील अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक बोलाविली आहे.
Comments are closed.