IND vs ENG: आकाश दीपने 12 वर्षांनंतर केली मोठी कामगिरी, सोशल मीडियावर झाले चाहते फिदा

इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर सुरू असलेल्या पाचव्या टेस्टमध्ये (Eng vs Ind 5th Test) नाईटवॉचमन म्हणून आलेल्या आकाश दीपने (Akash Deep) 94 चेंडूंमध्ये केलेली 66 धावांची खेळी किती महत्त्वाची ठरेल, हे तर नंतर कळेलच, पण ही खेळी करोडो भारतीय चाहत्यांच्या मनातून सहजासहजी पुसली जाणार नाही.

ज्या क्षणी टीम इंडिया (Team India) मालिकेत बरोबरीसाठी कर किंवा मरणाची लढाई लढत होती, त्या वेळी दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) आकाश दीप नाईटवॉचमन म्हणून नंबर-4 वर फलंदाजीला आला आणि त्याने शानदार 66 धावा करत अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं.

याचबरोबर आकाश दीपने जवळपास 12 वर्षांनंतर एक ऐतिहासिक कामगिरी केली. म्हणजे, 12 वर्षांमध्ये फक्त दुसरा भारतीय नाईटवॉचमन ठरला, ज्याने अर्धशतकी खेळी साकारली. याआधी अमित मिश्रा (Amit Mishra) यांनी 2011 मध्ये ह्याच मैदानावर इंग्लंडविरुद्ध 84 धावांची खेळी केली होती. या दमदार खेळीमुळे आकाश दीपने केवळ ड्रेसिंग रूममधील सहकाऱ्यांना खूश केलं नाही, तर चाहत्यांचीही मनं जिंकली.

Comments are closed.