उद्धव ठाकरे जुना वाद विसरले, ज्यांच्यामुळे सत्ता गेली त्यांच्याशी पुन्हा हात मिळवला, अकोल्यात ब

अकोला निवडणूक 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) तारीख जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील सर्व 29 महापालिकांमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, अकोल्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

Akola Election 2026: अकोल्यात प्रहार–ठाकरे गटाची युती

अकोल्यात बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत युती झाल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ज्या नेत्यांमुळे एकेकाळी सत्ता गेली. त्यांच्यासोबतचे जुने वाद विसरून उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंशी पुन्हा हात मिळवल्याचे पाहायला मिळत आहे.

Akola Election 2026: प्रहारचे उमेदवार मशाल चिन्हावर मैदानात

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रहार संघटनेचे चार उमेदवार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. प्रहारचे महानगराध्यक्ष मनोज पाटील हे प्रभाग क्रमांक 8 मधून मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार असून, त्यांच्यासोबत प्रहारचे आणखी तीन उमेदवारही याच प्रभागातून मैदानात उतरणार आहेत. या युतीची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचं सांगितलं जात असून, ठाकरे गटाने अकोल्यात संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी हा डाव टाकल्याचं मानलं जात आहे.

Akola Election 2026: मनसेनंतर आता प्रहारकडून ठाकरे गटासोबत युती

याआधीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मनसेसोबत युती जाहीर केली होती. त्यानंतर आता बच्चू कडूंची प्रहार संघटना ठाकरे गटासोबत येत असल्याने, ठाकरे गटाकडून महापालिका निवडणुकांसाठी विरोधकांना थेट आव्हान देण्याची रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे.

Akola Election 2026: अकोल्यात महायुतीचा तिढा कायम

एकीकडे ठाकरे गट युती वाढवत असताना, दुसरीकडे अकोल्यात महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. चर्चेच्या फेऱ्या वाढत असल्या तरी ठोस निर्णय होत नसल्याने महायुतीतील तणाव उघडपणे समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून चर्चेसाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक मैदानात उतरले असून, शिंदे गटाकडून मंत्री संजय राठोड अकोल्यात दाखल होणार आहेत. आज अकोल्यातील महायुतीचं भविष्य ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Akola Election 2026: भाजप कमी जागा देत असल्याचा आरोप

महायुतीतील दोन्ही मित्रपक्षांनी भाजपवर पुरेशा जागा देत नसल्याचा आरोप केला आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी उघडपणे 80 पैकी 35 जागांची मागणी केली असून, भाजप सन्मान ठेवत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. रात्री उशिरापर्यंत शिंदे गटाचे उपनेते आणि माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी जागावाटपावर चर्चा सुरू होती. भाजपचा प्रस्ताव मात्र 55 जागा भाजप, 15 शिंदेसेना आणि 10 अजित पवार गट असा असल्याने, मित्रपक्षांमध्ये असंतोष वाढत असल्याचे समजते.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Shivsena UBT Candidate List BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची 42 जणांची यादी; सुतार, वाडकर, फणसे, सावंत…कोणाकोणाला संधी?

आणखी वाचा

Comments are closed.