भयावह! अकोल्यातील मालवाहू वाहनासह ट्रॅक्टरमधील शेतमजुरांचा जीवघेणा प्रवास, VIDEO आला समोर
बातमीचे वर्णन केले गेले आहे: अकोल्यात एका मालवाहू वाहनासह ट्रॅक्टरमधील शेतमजुरांचा जीवघेणा प्रवास करतानाचा व्हिडिओ (VIDEO) समोर आलाय. यात ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या चिंतेचा विषय बनला असतानाच आता अकोल्यात प्रमुख रस्त्यावर शेतमजुरांचा हा जीवघेणा प्रवास सुरुये. असुरक्षित वाहनांतून शेकडो शेतमजूरांचा दररोज हा जीवघेणा प्रवास सुरूये. अकोल्यातल्या अकोट तालुक्यातल्या पणज आणि रुईखेड मार्गावर दररोज शेतमजुर असा हा धोकादायक प्रवास करताना सर्रास दिसून येतोय. ही घटना म्हणजे अपघाताला आमंत्रण देणारी ठरत असून व्हिडिओ समोर आल्याने यावर वेळीच योग्य ती दखल घेण्यात यावी अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
क्षमतेपेक्षा अधिक शेतमजूर कोंबून जीवघेणा प्रवास
विशेष म्हणजे ट्रॅक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात शेतातील साहित्य भरलेलं असतानाच त्यावर क्षमतेपेक्षा अधिक शेतमजूर कोंबून नेत असल्याचे video मधून स्पष्टपणे दिसत आहे. तर मालवाहून वाहनात देखील बसायला जागाही नसल्याचे चित्र बघावयास मिळतेय. मात्र, तरीही शेतमजूर वाहनात कोंबून नेल्या जात आहे. तर काही तरुण वाहनाच्या लोखंडी अँगलवर बसून प्रवास करतायेत. आपण पाहू शकता आज ही वाहने अपघातांना आमंत्रण देणारी ठरते आहेत. परंतु या वाहतुकीकडे स्थानिक वाहतूक पोलीसांचं अक्षरश: दुर्लक्ष होत आहे.
रोडगे पार्टी जिवावर बेतली, धमाशांच्या अचानक हल्ला
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतलीय. रोडगेच्या जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झालाय. तर अनेक जण यात जखमी झालेय. अकोल्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे शेतात रोडगे जेवणासाठी मोठ्या उत्साहात स्वयंपाक सुरू असताना अचानक मधमाश्यांनी हल्ला चढविला. मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झालाय. रेश्मा आतिश पवार यांचा यात मृत्यू झाला आहे.
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा जागीच दुर्देवी मृत्यू
दरम्यान, प्रकाश पांडुरंग पवार यांच्या शेतात आयोजित रोडगे जेवणाच्या कार्यक्रमात अचानक मधमाश्यांनी हल्ल्या चढवला. तर मीरा राठोड आणि दोन लहान मुलांसह काही अन्य लोक जखमी झाले आहेत. काल (24 फेब्रुवारी) दुपारपासून रोडगे पार्टीसाठी तयारी सुरू होती. रोडगेसाठी गोवऱ्या पेटवून रोडगे बनवण्याचे काम सुरू झाले. मात्र, याच गोवऱ्याच्या धुरामुळे जवळील मधमाश्यांचे पोळे फूटले आणि मधमाशांनी नागरिकांवर अचानक हल्ला चढवला होता. परंतु मधमाशांच्या हल्ल्यात रेश्मा पवार यांचा जागीच दुर्देवी झालाय. तर जखमींवर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.