अकोल्यात महायुतीत बिघाडी! राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदे गट एकत्र लढणार?

अकोला बातम्या : अकोल्यात महायुतीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरु आहे. भाजप पुरेशा जागा देत नसल्याने अकोल्यात राष्ट्रवादीकडून स्वाभिमान अणि सन्मानाचा नारा देण्यात आला आहे. सन्मानपूर्वक जागा नसतील तर वेगळा निर्णय घेऊ? जिथे सन्मान तिथे जाऊ अशी भूमिका राष्ट्रवादीचे मंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार अमोल मिटकरी यांनी घेतली आहे. आमदार अमोल मिटकरींच्या निवासस्थानी नुकतीच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पडली बैठक पार पडली. मंत्री इंद्रनील नाईक आता राष्ट्रवादीतील दुसऱ्या गटासोबत चर्चेसाठी आरजी हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. तर अमोल मिटकरी शिंदेंच्या शिवसेनेसोबत चर्चेसाठी बाजोरियांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत

राष्ट्रवादीची आज रात्री होणार भाजपसोबत अंतिम चर्चा

दरम्यान, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार? असल्याची चर्चा सुरु आहे.  कारण, दुपारीच शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपिकिशन बाजोरियांची भेट झाली होती. आता थोड्याच वेळात मंत्री इंद्रनील नाईक, शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची होणार भेट घेणार आहेत. शक्य झाल्यास रात्रीच अकोल्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज रात्री होणार भाजपसोबत अंतिम चर्चा. या बैठकीत नेमक्या काय घडामोडी घडतात?, याकडे लागलं जिल्ह्याचे लक्ष.

सन्मानजनक जागा न मिळाल्यास राष्ट्रवादीची भाजपसोबत युती तूटण्याची शक्यता

सन्मानजनक जागा न मिळाल्यास राष्ट्रवादीची भाजपसोबत युती तूटण्याची शक्यता आहे. उद्या दुपारपर्यत राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेची युतीची घोषणा होण्याची मोठी शक्यता. भाजप सन्मान जनक जागा देत नसल्याचा आमदार अमोल मिटकरींचा आरोप.

राज्यात महापालिका निवडणुकांसाठी (Maharashtra Municipal Corporation Election 2026) राजकीय वातावरण तापलं आहे. 29 महापालिकेसाठी 23 डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. 30 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळं अर्ज भरण्यास बाकी दोन दिवसच उरले आहेत. त्यामुळं राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांनी हालचाली सुरु केल्या आहेत. युती आघाडी करण्यासंदर्भात जोरदार चर्चा देखील सुरु आहेत. एक ते दोन दिवसात सगळं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025

नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025

उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026

अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026

मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026

मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026

महत्वाच्या बातम्या:

पुण्यात ठाकरे बुंधुंची काँग्रेससोबत हातमिळणी! ठाकरे गट आणि मनसेच्या बैठकीत काय ठरलं? कोणाला किती जागा?

आणखी वाचा

Comments are closed.