अक्षय कुमारने 7 महिन्यांत मुंबईतील 110 कोटींची मालमत्ता विकली

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याने गेल्या सात महिन्यांत एकूण आठ मालमत्तांची विक्री केलीय. अक्षय कुमारने विक्री केलेल्या या संपत्तीची किंमत जवळपास 110 कोटी रुपये इतकी आहे. या विक्रीमध्ये बोरिवली, वरळी आणि लोअर परळसारख्या प्राइम लोकेशन्समधील लक्झरी अपार्टमेंट्स आणि कमर्शियल ऑफिस स्पेसचा समावेश आहे. बोरिवलीतील 3 बीएचके अपार्टमेंट रुपये 4.25  कोटींना विकले. वरळीतील लक्झरी अपार्टमेंट 80 कोटींना विकले. हे अपार्टमेंट 6,830 चौरस फुटांचे असून 39 व्या मजल्यावर आहे.  बोरिवली पूर्वमधील थ्री बीएचके रुपये 4.35 कोटींना विकले. आणखी एक थ्री बीएचके प्लस अपार्टमेंट 6.60 कोटी रुपयांना विकले.

Comments are closed.