अक्षय कुमारच्या मुलीला ऑनलाइन गेम खेळताना करण्यात आली ‘घाणेरडी’ मागणी, अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रकार

सायबर जागरूकता होण्यासाठी ऑक्टोबर हा महिना साजरा केला जातो. या जागरुकतेचा प्राथमिक उद्देश हा ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने त्याची १३ वर्षांची मुलगी नितारा हिच्याशी ऑनलाइन गेम खेळताना घडलेल्या एका विचित्र घटनेचा प्रकार सांगितला.
‘सायबर जागरूकता महिना ऑक्टोबर २०२५’ चे उद्घाटन ३ ऑक्टोबर रोजी मुंबईतील पोलिस महासंचालक (डीजी) कार्यालयात करण्यात आले. या शासकीय कार्यक्रमामध्ये अक्षयने एक धक्कादायक प्रकार सांगितला.
अक्षय कुमारने त्याची १३ वर्षांची मुलगी नितारा हिच्याशी संबंधित एक त्रासदायक, वास्तविक जीवनातील घटना शेअर केली. अक्षयची मुलगी काही महिन्यांपूर्वी ऑनलाइन व्हिडिओ गेम खेळत असताना, एका अनोळखी व्यक्तीसोबत तिची ओळख झाले. या व्यक्तीने सुरुवातीला तिच्याशी मैत्री केली आणि नंतर लगेचच तिच्याकडे नग्न फोटोंची मागणी केली होती.
या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करताना अक्षय म्हणाला, ही पद्धत सायबर गुन्ह्यांच्या मोठ्या पॅटर्नचा भाग आहे. इथे अल्पवयीन मुलांचे शोषण करण्याचा प्रयत्त्न केला जातो. यामुळे अनेकदा अशा घटनांमुळे खंडणीचे प्रमाण वाढते. त्यासोबत आत्महत्येच्या दुःखद घटना घडतात.
Comments are closed.