अक्षय खन्नाचा ‘हा’ लूक पाहून भरेल धडकी, आगामी चित्रपटाचे पोस्टर होतेय व्हायरल

धुरंदर हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहेत. या चित्रपटात अक्षय खन्नाने वठवलेली रेहमान डकैतची भूमिका तर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अक्षयचे डायलॉग, त्याचा डान्स, त्याचे एक्सप्रेशन, त्याने दाखवलेली क्रूरता सर्वच सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे रेहमान डकैतच्या भूमिकेवरून अक्षय खन्नाचे कौतुक होत असतानाच त्याच्या आगामी तेलगू चित्रपटातील लूक व्हायरल झाला आहे.
देवांच्या सावलीत,
विद्रोहाची तेजस्वी ज्योत पेटली 🔥सादर करत आहे The Enigmatic #अक्षयखन्ना as the eternal ‘Asuraguru SHUKRACHARYA’ from #महाकाली 🔱❤️🔥@पूजा कोल्लुरु @RKDStudios #आरकेदुग्गल #रिवाझरमेशदुग्गल @ThePVCU pic.twitter.com/mclj39Q8z9
— प्रशांत वर्मा (@PrasanthVarma) 30 सप्टेंबर 2025
अक्षय खन्ना प्रशांत ‘महाकाली’ या चित्रपटात शुक्राचार्यांच्या भूमिकेत दिसणार असून त्याचा हा लूक सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. मात्र त्यावेळी या लूकची इतकी चर्चा झाली नाही. आता धुरंदर रिलीज झाल्यानंतर अक्षय खन्नाच्या चाहत्यांनी त्याचा महाकाली मधली लूक व्हायरल केला आहे.


Comments are closed.