न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली; काळाने घाला घातला, निकालाच्या दिवशीच हृदयविकाराचा झटका

अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील हाणामारी प्रकरणात तब्बल १३ वर्षांनी निर्दोष सुटलेले नितेश गुरव यांच्यावर काळाने घाला घातला आहे. या खटल्याचा निकाल जिल्हा न्यायालयाने बुधवारी दिला. जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्यासह २१ आरोपींना सात वर्षे तीन महिने कारावास व ७ हजार ३०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. नितेश गुरव यांच्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली. त्यानंतर काही तासात गुरव यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
चोंढी गावात १३ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी आपल्या साथीदारांसह पाच जणांना तलवार, लोखंडी शिगा व लाकडी दांडक्याच्या सहाय्याने मारहाण केली होती. या प्रकरणात २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. न्यायालयाने दिलीप भोईर यांच्यासह २१ जणांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली, तर चार जणांची निर्दोष मुक्तता केली.
निकालानंतर अस्वस्थ वाटू लागले निर्दोष मुक्तता झालेल्या
नितेश गुरव यांना निकालानंतर न्यायालयातच अस्वस्थ वाटू लागले, गुरव यांना यकृताचा आजार होता, निकाल ल ागल्यानंतर झिराड येथील घरी जाताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय सहकाऱ्यांनी घेतला. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments are closed.