मुलगी पायलट असलेल्या विमानातून अलका कुबल यांचा प्रवास
प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांची लेक पायलट बनली आहे. पायलट असलेल्या विमानातून अलका कुबल यांनी विमान प्रवास केला. याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोला अनेकांनी लाईक केले असून अलका कुबल आणि त्यांच्या मुलीचे तोंडभरून कौतुक केले आहे. अलका कुबल यांची मोठी मुलगी ईशानी ही पायलट बनली आहे. ती सध्या वैमानिक म्हणून काम करतेय, परंतु ती चालवत असलेल्या विमानात अलका कुबल यांना प्रवास करण्याची संधी मिळाली. यानंतर कुबल यांनी वैमानिक लेकीसोबतचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी छानशी कॅप्शनही लिहिली आहेत. त्यात म्हटले की, ही आहे माझ्या आजच्या विमानाची कॅप्टन. त्यांच्या या फोटोवर नेटकऱयांसोबत मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीजमधील कलाकारांनीदेखील माय-लेकीचे कौतुक केले आहे.
Comments are closed.