निर्णायकी! रविवारी हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात महत्त्वाची लढत, तिसऱ्या वन डे सामन्यात रोहित शर्मावर सर्वांच्या नजरा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रविवारी जेव्हा हिंदुस्थानी संघ इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक तिसऱया वन डे सामन्यासाठी लॉर्ड्सवर मैदानात उतरेल तेव्हा संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष रोहित शर्मावर असेल. कारण रोहितचा हा अखेरचा सामना असेल, अशी चर्चा सुरू आहे. पण त्याचबरोबर हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यासाठी हा करो या मरो, असाच सामना असेल. त्यामुळे क्रिकेटची पंढरी असलेल्या या मैदानात कोणता संघ जिंकतो आणि रोहित खरंच निवृत्ती जाहीर करतो का, याकडे लक्ष लागलेले असेल.

रोहितसाठी महत्त्वाचा सामना

रोहित या मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये दिसला नाही. ज्यामुळे रोहित पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाला मुकणार असल्याची चर्चा आहे. रोहित या सामन्यानंतर निवृत्ती जाहीर करेल, या चर्चेला उत आले आहे.

जो रूट मोठा अडसर

हिंदुस्थानच्या विजयामध्ये जो रूट हा सर्वात मोठा अडसर असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे  हिंदुस्थानला जर विजय मिळवायचा असेल तर त्याला हिंदुस्थानी गोलंदाजांना लवकर बाद करावे लागेल. रूट वगळता इंग्लंडच्या उर्वरित फलंदाजांनी फारशी चांगली कामगिरी केलेली नाही.

रोहितबाबत बीसीसीआयने मौन सोडले

रोहित शर्माच्या निवृत्तीच्या बातम्या बीसीसीआयने पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘रोहित शर्माच्या भविष्याबद्दल माध्यमांमध्ये अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मी पूर्ण जबाबदारीने सांगू इच्छितो की, रविवारी लॉर्ड्सवर रोहित आपला शेवटचा सामना खेळेल अशी कोणतीही चर्चा बीसीसीआयमध्ये झालेली नाही.’

Comments are closed.