All parties back the protest march organized by Maharashtra Navnirman Sena in Mumbai
मुंबई : मुंबई महापालिकेच्या लांबलेल्या निवडणुकीचे सर्वांना वेध लागलेले असताना मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यात ‘दे टाळी’ संवाद सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिकेसमोरील पत्रकार संघात आज (26 एप्रिल) आयोजित केलेल्या प्रतिसभागृहाकडे भाजपा, शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी पाठ फिरवली. मात्र तरीही मनसेच्या माजी नगरसेवक, पदाधिकारी आदींनी प्रतिसभागृहात मुंबईतील पाणी, रस्ते, खड्डे, आरोग्य समस्या आदींबाबत तक्रारींचा पाढा वाचत चर्चा घडवून आणली. तसेच, यावेळी महापौर बनलेले ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांनी सदर नागरी संस्था मार्गी लावण्यासाठी आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच, मुंबईकरांच्या नागरी समस्या पालिका प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करून त्या मार्गी लावाव्यात, असे निर्देश प्रशासनाला दिले. (All parties back the protest march organized by Maharashtra Navnirman Sena in Mumbai)
दरम्यान, मुंबई महापालिकेतील भाजपा पक्षातर्फे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना, एक पत्र देण्यात आले. त्यामध्ये, गेल्या 25 वर्षांपासून पालिकेत सत्ता गाजविणाऱ्या ज्या पक्षाने भ्रष्टाचार केला त्यांना या प्रतिसभागृहात निमंत्रित केल्याने नाराजी व्यक्त करीत प्रतिसभागृहात येण्यास नकार दर्शवला. तर, उबाठातर्फे सुद्धा या प्रतिसभागृहात कोणीही उपस्थित राहिले नाही. त्याचप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आदींनी देखील या प्रतिसभागृहाकडे पाठ फिरवली. मात्र मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक, पदाधिकारी आदींनी मुंबईतील पाणी, आरोग्य, रस्ते, खड्डे, पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणे आदी नागरी समस्यांबाबत तक्रारी करीत पालिका प्रशासकीय यंत्रणेच्या कारभारावर ताशेरे ओढले.
मनसेचे विभाग समिती सदस्य संदीप कोलते यांनी नाले सफाई व्यवस्थित होत नसल्याच्या समस्येकडे लक्ष वेधले. मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे व संदीप कटके यांनी मुंबईतील रुग्णालयातील असुविधांबाबत मुद्दे मांडले. माजी नगरसेविका शृगांरपुरे यांनी व वैश्नवी सरफरे यांनीही विविध नागरी समस्यांवर आवाज उठवित प्रतिसभागृहाचे व महापौरांचे लक्ष वेधले. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी लक्ष वेधत मागील 10 वर्षातील रस्ते कामांच्या खर्चाच्या तातडीने श्वेत पत्रिका काढण्याची मागणी केली. सभागृहातील सदस्यांनी नागरी समस्यांवर आवाज उठविला.
प्रती पालिका सभागृहाचे महापौर संदीप आचार्य यांनी सदस्यांनी मांडलेल्या नागरी समस्यांची दखल घेत या समस्यांचे निवेदन पालिका आयुक्तांना देण्यात येईल, असे आश्वासित केले. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनीही महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. येत्या 17 मे रोजी भांडुप येथे प्रतिमहापालिका सभागृह आयोजित करण्यात येईल, असे महापौर पद भूषविणारे ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांनी सांगितले.
हेही वाचा – Ajit Pawar : माझा पदाधिकारी दोन नंबरवाला असेल तर…; अजितदादांचा इशारा
Comments are closed.