IGT controversy : शोचे सर्व व्हिडीओ केले डिलीट, माझा एकमेव उद्देश लोकांना हसवणं होता; वादानंतर समय रैनाचे स्पष्टीकरण

कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये यूट्युबर रणवीर इलाहाबादियाच्या कमेंटने खळबळ माजली. इलाहाबादीने या शो मध्ये आई-वडिल आणि कुटुंबाबाबत अश्लील टिप्पण्या केल्या होत्या. यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल झाली आहे. याच दरम्यान आता घडलेल्या प्रकारावर समय रैना याने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. समयने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आणि दावा केला आहे की, त्याने त्याच्या शोचे सर्व व्हिडीओ यूट्यूबवरून डिलीट केले आहेत. त्याने असेही म्हटले की, त्याचा हेतू फक्त लोकांना हसवणे हा होता.

काय म्हणाला समय रैना?

समय रैना म्हणाला आहे की, ”जे काही घडत आहे ते मी हाताळू शकत नाही. मी माझ्या चॅनेलवरून इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडीओ डिलीट केले आहेत. माझा एकमेव उद्देश लोकांना हसवणे आणि त्यांना आनंद देणे हा होता. मी सर्व तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करेन जेणेकरून त्यांचा तपास योग्यरित्या करता येईल.”

Comments are closed.