Allegations and counter-allegations of Jitendra Awhad and Suresh dhas regarding the death case of Somnath Suryavanshi in Parbhani
जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा आमदार सुरेश धस यांचा एक व्हिडीओ ट्वीट आज ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये परभणी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावेत हा आग्रह धरू नका. काही गोष्टींमध्ये मोठ्या मनाने माफ करायचे असते, असे सुरेश धस व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. या प्रकरणी आता संताप व्यक्त करत सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाड यांना सुनावले आहे.
बीड : परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा आमदार सुरेश धस यांचा एक व्हिडीओ ट्वीट आज ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये परभणी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावेत हा आग्रह धरू नका. काही गोष्टींमध्ये मोठ्या मनाने माफ करायचे असते, असे सुरेश धस व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. या प्रकरणी आता संताप व्यक्त करत सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाड यांना सुनावले आहे. (Allegations and counter-allegations of Jitendra Awhad and Suresh dhas regarding the death case of Somnath Suryavanshi in Parbhani)
जितेंद्र आव्हाडांच्या आरोपावर बोलताना सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, जे पोलीस अॅक्शन मोडमध्ये नव्हते त्यांच्याबाबतीत विचार करा, असे आवाहन मी केले होते. जे पोलीस सीसीटीव्हीमध्ये दिसतात किंवा जे दोषी आहेत, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. परंतु ज्यांचा यात दोष नाही त्यांची नावे घेऊ नका, असे मी म्हणालो होतो. जे कुठेच रेकॉर्डवर नाहीत, त्यांचे निलंबन करायचे म्हटले असते तर पोलीस दलाच्या मनोबलावर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि यात काहीही चूक नाही. त्यामुळे ज्यांनी अक्षय शिंदेची बाजू घेतली होती, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.
हेही वाचा – Uddhav Thackeray : बाळासाहेबांचा मुलगा दहावीला नापास, ठाकरेंनी सांगितला शाळेतला किस्सा
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांचा व्हिडीओ ट्वीट करताना म्हटले होते की, दुसर्याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसर्याने येऊन, “जाऊ द्या, त्याला माफ करा”, हे बोलणे खूप सोपे असते. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल, हेही जर बोलणार्यास कळू नये, याला काय म्हणावे. सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते. अर्थात, हा ज्याचा-त्याचा विचार आहे. पण, कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही. ज्यांनी सोमनाथला मारलंय, त्यांना कायद्याचा मार बसेलच, याची खात्री आम्ही देतो. एवढेच जर आपल्यामध्ये क्षमा याचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधू संत व्हावे आणि वाल्मिक कराडलाही माफ करावे. सोमनाथ सुर्यवंशी छोट्या समाजाचा आहे. त्याच्या मागे पाठबळ नाही म्हणून सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावे, ही भावनाच मूळात वर्णवर्चस्ववादी आहे. खून हा खून असतो अन् खुनाला माफी नाही. अक्षय शिंदे, सोमनाथ सुर्यवंशी आणि संतोष देशमुखचा खूनच झाला आहे. तिघांच्याही खुनाला माफी नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.
हेही वाचा – Pankaja Munde : माझ्याकडे आता सत्तेचे 1825 दिवस, काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
Comments are closed.