डेवॉल्ड ब्रेविसच्या शतकी खेळीनंतर एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य! जाणून घ्या काय म्हणाला?
दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने (Dewald Brevis) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात (Australia vs South Africa, 2nd T20I) केवळ 42 चेंडूत शतक झळकावले. यामुळे तो दक्षिण आफ्रिकेसाठी टी20 क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद शतक करणारा फलंदाज ठरला. पहिल्या क्रमांकावर डेविड मिलर असून, त्याने 2017 मध्ये बांगलादेशविरुद्ध केवळ 35 चेंडूत शतक केले होते.
ब्रेविसचे हे शतक पाहून त्याचा आदर्श आणि माजी महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (Ab devilliers) या युवा खेळाडूबद्दल मोठे विधान केले. एबीने ‘X’ म्हणजेच ट्विटरवर लिहिले की, मेगा लिलावात आयपीएल संघांकडे ब्रेविसला घेण्याची मोठी संधी होती, पण बहुतेकांनी ती गमावली. मात्र, चेन्नई सुपर किंग्स खूप नशिबवान ठरला. हा मुलगा सर्वकालीन सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक खेळाडू ठरू शकतो.
चेन्नईने ब्रेविसला जखमी गुर्जपनीत सिंगच्या ऐवजी संघात घेतले होते. तो रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून आला आणि त्याने 6 डावांत 37.50 च्या सरासरीने, 180 च्या स्ट्राइक रेटने एकूण 225 धावा केल्या. मोठ्या संख्येने चाहत्यांनी एबीच्या विधानाला पाठिंबा दिला आहे आणि यात शंका नाही की त्याचे म्हणणे अगदी बरोबर आहे.
Comments are closed.