अमळनेर हादरले! गावठी कट्ट्याची माहिती देत होता, तेवढ्यात सुटली गोळी अन् तरुणाचा जागीच अंत; मित्
अमळनेर (जळगाव): शहरातील अमलेश्वर नगर परिसरात शुक्रवारी रात्री एका गावठी कट्ट्यातून झालेल्या ‘मिसफायर’मुळे (Jalgaon Crime News) ३५ वर्षीय तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. अरुण सुरेश महाजन असे मृत तरुणाचे नाव असून, तो मंडप व्यवसायाशी निगडित होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयित आरोपी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Jalgaon Crime News)
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास अरुण महाजन हा आपल्या काही मित्रांसोबत माळीवाडा परिसरात गप्पा मारत बसला होता. यावेळी त्याचा मित्र भूषण महाजन हा आपल्याजवळील गावठी कट्ट्याबद्दल (पिस्तूल) माहिती देत होता. तो कट्टा हाताळत असताना अचानक त्यातून ‘मिसफायर’ झाले आणि गोळी थेट अरुणच्या छातीत घुसली.(Jalgaon Crime News)
गोळी लागताच अरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. यावेळी रुग्णालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.(Jalgaon Crime News)
पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल
याप्रकरणी अमळनेर पोलिसांनी भूषण महाजन याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात हा अपघात वाटत असला तरी, पोलिसांकडून अनेक अँगलने तपास सुरू आहे. कट्टा कोठून आला? भूषण महाजन याच्याकडे हा बेकायदेशीर गावठी कट्टा कोठून आणि कशासाठी आला? वाद झाला होता का? गोळी सुटण्यापूर्वी मित्रांमध्ये काही वाद झाला होता का की हा केवळ निष्काळजीपणाचा प्रकार आहे? या सर्व बाजुने तपास सुरू आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.(Jalgaon Crime News)
आणखी वाचा
Comments are closed.