अमर पटनायक यांचा भाजपमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

बीजद प्रमुख आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. बीजदमधून वरिष्ठ नेत्यांचे होणार पलायन आणि राज्यात भाजपचा विस्तार यामुळे नवीन पटनायक यांच्यासमोर पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. माजी राज्यसभा खासदार आणि बीजदच्या आयटी विभागाचे प्रमुख अमर पटनायक यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भुवनेश्वर येथील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, पक्षप्रभारी विजयपाल सिंह तोमर आणि प्रदेशाध्यक्ष मनमोहन समल यांच्या उपस्थितीत पटनायक यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

एकेकाळी अमर पटनायक यांना बीजदची रणनीति आाणि तांत्रिक शक्तीचा चेहरा म्हणून ओळखले जात होते. पटनायक हे भारताचे महालेखाकार (प्रिन्सिपल अकौंटंट जनरल) राहिले आहेत. 2018 मध्ये स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेत ते राजकारणात दाखल झाले होते. 2019 मध्ये बीजदने त्यांना राज्यसभेवर पाठविला होता, त्यांचा हा कार्यकाळ फेब्रुवारी 2024 मध्ये समाप्त झाला होता.

Comments are closed.