Drishyam 3 प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात; अमेझॉन प्राईमने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा; वाचा सविस्तर
दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘दृश्यम ३’ प्रदर्शनापूर्वीच कायद्याच्या अडकला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडीओने (Amazon Prime Video) या चित्रपटाच्या डिजिटल हक्कांबाबत (Digital Rights) एक अधिकृत नोटीस (Public Notice) जारी केली आहे. यामध्ये कंपनीने स्पष्ट केले आहे की, जर निर्मात्यांनी इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मशी करार केला, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे वृत्त ‘एबीपी न्यूज’ने दिले आहे.
अमेझॉन प्राईम व्हिडीओनुसार, ‘दृश्यम ३’ चे सर्व डिजिटल राईट्स त्यांच्याकडे सुरक्षित आहेत. आशीर्वाद सिनेमासोबत झालेल्या करारानुसार, या चित्रपटाचे SVOD (सबस्क्रिप्शन व्हिडिओ ऑन डिमांड), TVOD (ट्रान्झॅक्शनल व्हिडिओ ऑन डिमांड), AVOD आणि इतर सर्व डिजिटल अधिकार केवळ अमेझॉनकडेच आहेत. आता आशीर्वाद सिनेमा किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही पक्षाकडे या चित्रपटाचे कोणतेही अधिकार उरलेले नाहीत, असा दावा कंपनीने केला आहे.
अमेझॉनने आपल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, जर कोणत्याही व्यक्तीने किंवा इतर डिजिटल प्लॅटफॉर्मने अमेझॉनच्या परवानगीशिवाय या चित्रपटाच्या हक्कांबाबत व्यवहार केला, तर होणाऱ्या नुकसानीला आणि कायदेशीर परिणामांना ते स्वतः जबाबदार असतील. आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी अमेझॉन योग्य ती कायदेशीर पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
Comments are closed.