करवीर निवासिनी श्रीअंबाबाईच्या मुळ मुर्तींचे दर्शन 17 मार्चपर्यंत बंद
साडेतीन शक्तीपीठापैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात आज सकाळपासून संवर्धन देखभाल दुरुस्ती अंतर्गत मुख्य गाभाऱ्याचे काम सुरू झाले.त्यामुळे देवीच्या मुळ मुर्तीचे दर्शन बंद करण्यात आले असून,या कालावधीत भाविकांसाठी श्रीच्या प्राणप्रतिष्ठापीत मंगल श्रीकलश तसेच श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन मुक्ती मंडप (पितळी उंबरा) येथून करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
भक्तांना पितळी उंबरठा व श्रीगणपती मंडप येथून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.तर मंगळवार,दि. १७ मार्च रोजी आवश्यक ते सर्व आगमोक्त्त व वेदोक्त धार्मिक विधी तसेच पूर्णाहुती संपत्र झाल्यानंतर दुपारी १२.३० वाजताच्या आरतीपासून श्रीजगदंबेचे दर्शन पूर्ववत सुरू करण्यात येईल,अशी माहिती श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळ आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कडून देण्यात आली.
सध्या याच मंदिर संवर्धनांतर्गत मंदिरातील श्रीमहाकाली, श्रीअंबाबाई व श्री महासरस्वती या तिन्ही गर्भगृहांचे अंतर्गत व बाहा भागांचे जतन व संवर्धनाचे काम आज सकाळपासुन सुरू करण्यात आले.त्यामुळे गर्भगृहांतील नेहमीप्रमाणे दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली.
Comments are closed.