Ambadas Danve alleged that Mohit Kamboj runs the state water resources department


अंबादास दानवे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलताना मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केला. मोहित कंभोज राज्याचा जलसंपदा विभाग चालवतात, असा थेट आरोप दानवे यांनी केला.

मुंबई : भाजपा नेते आणि आपल्या वक्तव्यामुळे अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चेत राहणारे मोहिम कंबोज हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलताना मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केला. मोहित कंभोज राज्याचा जलसंपदा विभाग चालवतात, असा थेट आरोप दानवे यांनी केला. (Ambadas Danve alleged that Mohit Kamboj runs the state water resources department)

अंबादास दानवे म्हणाले की, ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणाऱ्या जलसंपदा आणि जलसंधारण खात्यात जर एखाद्या अधिकाऱ्याला फोन केला तर त्यावर मोहित कंबोज निर्णय घेतात. जलसंपदा विभागातील बड्या अधिकाऱ्याशी मोहित कंबोज यांचे कनेक्शन आहे. दीपक कपूर नावाचे अधिकारी मोहित कंबोजांना विचारल्याशिवाय पाणीही पीत नाहीत. मोहित कंबोजांना विचारल्याशिवाय जलसंपदा विभागाचे पानही हलत नाही. कोण आहे हा मोहित कंबोज? मोहित कंबोज जलसंपदा विभागात हस्तक्षेप करतोच कसा? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. त्यांनी असेही म्हटले की, राज्यात पाट, चाऱ्या आणि दुरुस्ती असे वेगवेगळे प्रश्न असताना सर्व निर्णय मोहित कंबोज घेतात. हे सगळं पुरावा आहे म्हणूनच बोलतोय असा दावा दानवे यांनी केला.

हेही वाचा – Ambadas Danve : सरकारच्या पाठिंब्याशिवाय अशा गोष्टी होऊ शकत नाही, दानवेंचा थेट आरोप

मोहित कंबोजने काय केले हे सांगू का?

कोणाचे नाव घेऊन बोलू शकत नाहीत असा आक्षेप सत्ताधऱ्यांकडून घेण्यात आला. यावर मोहित कंबोज तुमचा जावई आहे का? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला. ते पुढे म्हणाले की, सभागृहातील खालच्या वरच्या सदस्यांचे नाव घ्यायचे नसते, पण बाहेरच्या व्यक्तीचे नाव घ्यायला बंधन नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो मोहित कंबोज राज्याचा जलसंपदा विभाग चालवतो. मोहित कंबोज आणि अधिकारी दीपक कपूर या दोघांमधील झालेले संभाषण आणि त्यांचा सीडीआर तपासा, अशी मागणी दानवे यांनी केल्यावर सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावर कोणत्या कोणत्या कामात मोहित कंबोजने काय केले हे सांगू का? कुठल्या मंत्र्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केलेला मी समजू शकतो, पण मोहित कंबोजने हस्तक्षेप करण्याचे कारण काय? असे प्रश्नही उपस्थित करत अंबादास दानवे यांनी उपस्थित केले.

हेही वाचा – Shinde Vs Pawar : धुसफूस सुरूच, एनसीपीकडून ‘छावा’चा खास शो अन् शिंदे गटाची अनुपस्थिती



Source link

Comments are closed.