शीतल तेजवानीच्या पार्टनरला अटक का नाही? पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी अंबादास दानवे यांचा सवाल

पुणे जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानी यांना अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणी त्यांच्या पार्टनरला अटक करण्यात का आली नाही असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी विचारला आहे. तसेच या प्रकरणी ज्या अधिकाऱ्यांनी मुद्रांक शुल्क माफ केले त्यांची नावं कधी बाहेर येणार असेही दानवे म्हणाले.
एक्सवर पोस्ट करून अंबादास दानवे म्हणाले की, पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला ‘अखेर’ अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे..
1. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही?
2. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस ‘मुदतवाढ-मुदतवाढ’ खेळणार आहात?
3. अमेडिया कंपनीत केवळ 1 टक्का भागधारक दिग्विजय हा 99 टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का?
4. मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार?
ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही महोदय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची कल्पना नाही असे सांगणे, हे जनतेला शुद्ध वेडे बनवणे आहे. ते ही बहुमताच्या जोरावर! असेही अंबादास दानवे म्हणाले.
पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला ‘अखेर’ अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे..
१. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही?
२. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर…— अंबादास दानवे (@iambadasdanve) ४ डिसेंबर २०२५

Comments are closed.