नागपुरातील घटनेला सरकार जबाबदार, नागपूरकरांनी शांतता बाळगावी – अंबादास दानवे

नागपुरात ज्यापद्धतीने परिस्थिती निर्माण झाली आहे, या परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर केली आहे. नागपुरातील महाल परिसरात दोन गट समोरासमोर आले असून दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. या दगडफेकीत पोलीसही जखमी झाले आहेत. यावरच आपली प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

अंबादास दानवे म्हणाले आहेत की, ”गेल्या काही दिवसांपासून राज्याचे वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारच असं वातावरण चिघळवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ज्यामुळे राज्यात हिंदू-मुस्लीम वातावरण निर्माण होईल. हिंदूंच्या मनात वेगळी भीती, मुस्लीमांच्या मनात वेगळी भीती निर्माण होऊन दंगल होईल, राज्य सरकार स्वतःच्या या उद्दिष्टात यशस्वी झालं आहे. पण जनतेने, ज्यात हिंदू असतील किंवा मुस्लीम असतील, त्यांनी सरकारचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नये. आपण शांतता बाळगावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Comments are closed.