राजा शिवाजी चित्रपट करमुक्त करा, अंबादास दानवे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित झाला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार गाजत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या तीन दिवसात या चित्रपटाने 37 कोटींचा आकडा पार केला आहे. दरम्यान हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त केला जावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधानपरिषदेतील माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दानवे यांनी याबाबत एक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहले आहे.

Raja Shivaji Review – शौर्य, धैर्य आणि पराक्रमाची महागाथा!

”छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य, त्यांचे अद्वितीय शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेचा महान इतिहास हा महाराष्ट्राच्या तसेच संपूर्ण देशाच्या अस्मितेचा कणा आहे. त्यांनी स्थापन केलेले ‘हिंदवी स्वराज्य’ हे केवळ राज्यव्यवस्था नसून न्याय, समानता, स्त्रीसुरक्षा, शेतकरी संरक्षण व धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांवर आधारित एक आदर्श शासनपद्धती होती. त्यांच्या जीवन कार्यावर आधारित अभिनेता रितेश देशमुख लिखित – दिग्दर्शित “राजा शिवाजी” हा चित्रपट कर मुक्त करण्यात यावा, अशी मागणी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करत आहे”, असे अंबादास दानवे यांनी ट्विट केले आहे.

Comments are closed.