गंगापूर रस्त्यावर दुचाकींचा भीषण अपघात, अंबादास दानवे धावले मदतीला; जखमींना स्वत:च्या गाडीतून रुग्णालयात नेले

गंगापूर लासूर – कानोरी रस्त्यावर सोमवारी सायंकाळी दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले. अलीम पठाण (लासूर स्टेशन) आणि सूरज लकवाल (कानोरी) अशी त्या तरुणांची नावं आहेत.

त्याचवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची गाडी तिथूनच जात होती. त्यावेळी अंबादास दानवे गाडीतून उतरले व त्यांनी जखमी तरुणांना आपल्या गाडीने लासूर स्टेशनजवळील रुग्णालयात दाखल केले.

Comments are closed.