प्रशांत कोरटकरला ताब्यात का घेतलं नाही – अंबादास दानवे

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्याला ताब्यात घेण्यात आलं नाही, अशी माहिती मिळत आहे. त्याची चौकशी करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे एक पथक नागपूरमध्ये दाखल झालं आहे. याचदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अद्याप प्रशांत कोरटकरला ताब्यात का घेतलं नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे म्हणाले की, ”याप्रकरणी मी कोल्हापूरचे एसीपी यांच्याशी बोललो आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, नियमित प्रक्रियेत जर एखाद्या व्यतीने दुसऱ्या व्यक्तीला फोनद्वारे धमकी दिली तर, त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात येतं. मात्र अजूनही त्याला ताब्यात घेतलं नाही. त्याला ताब्यात घेतलं नाही तर, आम्हाला योग्य पद्धतीने उत्तर द्यावं लागेल.”
Comments are closed.