भाजप संधीसाधू, यूज अँड थ्रो हेच त्यांचे धोरण; अंबादास दानवे यांची सडकून टीका

भारतीय जनता पक्ष संधीसाधून असून यूज अँड थ्रो हेच त्यांचे धोरण असल्याची सडकून टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी केली. ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशीचीही मागणी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत महायुती एकत्र लढेल असे विधान केले. याबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, भाजप संधीसाधू आहबे. मुंबईत ताकद नाही म्हणून त्यांना इतरांना सोबत घ्यायचे आहे. ठाणे, पिंपरी चिंचवड, पुणे, नाशिकसह संभाजीनगर येथे ताकद नसेल तिथे त्यांना डावलायचे ही भाजपची पद्धत आहे. यूज अँड थ्रो हे भाजपचे धोरण आहे.

मुंबईत त्यांना गरज आहे. मुंबई बाळासाहेबांची, उद्धव ठाकरे यांची शिवसेना मजबूत आहे. जनता शिवसेनेच्या मागे आहे. तिचा मुकाबला एकट्याने करणे शक्य नाही म्हणून तिथे एकत्र व्हायचे. बाकीच्या ठिकाणी यांना दूर करायचे ही फडणवीस आणि भाजपची दुहेरी निती आहे, असेही दानवे म्हणाले.

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा मुंबईवरून उतरवणं हेच महायुतीचं अंतिम ध्येय, म्हणून इथे ते एकत्र लढायला तयार; संजय राऊत यांचा घणाघात

पुण्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर दानवे म्हणाले की, रवींद्र धंगेकर जे बोलले त्याची चौकशी झाली पाहिजे आणि सत्यता समोर आली पाहिजे. धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले आहे. केंद्रातील सत्ता आणि राज्यातील सत्तेचा मोहोळ वापर करतात हे स्पष्ट आहे. त्यामुळे धंगेकर यांच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली.

मुरलीधर मोहोळ अजूनही गोखले बिल्डरच्या कंपनीचे भागीदार, रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप

Comments are closed.